39.4 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home विदर्भ नृत्य व गायन स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्काराचे वितरण

नृत्य व गायन स्पर्धेतील विजेत्यांना पुरस्काराचे वितरण

0
27
गोंदिया,दि.03ः विदर्भ साहित्य संघ शाखा गोंदिया च्या वतीने दिनांक 26जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने देशभक्तीपर गीतांवर आधारित  आंतरशालेय नृत्य स्पर्धेचे आयोजन विनायकराव कोतवाल सभागृहात करण्यात आले होते. या स्पर्धेत 5 ते 7 च्या विद्यार्थ्यां करिता समुह नृत्य व 8 ते 10 च्या विद्यार्थ्यां करिता एकल नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेसाठी अरविंद बरडे,  दिपा भौमिक व अंकिता बडगुजर यांनी परिक्षकांचे स्थान भूषविले.समुह नृत्य स्पर्धेत सेंट झेव्हियर्स शाळेने तिसरा, जे.एम‌व्ही शाळेने दुसरा व गुजराती नॅशनल हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. एकल नृत्य स्पर्धेत दिल्ली पब्लिक स्कुलने तिसरा, लिटिल वुडस शाळेने दुसरा व गुजराती नॅशनल हायस्कूलने प्रथम क्रमांक पटकावला. विजयी चमूंना सन्माननीय परिक्षक व अध्यक्षांच्या हस्ते स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान माणिक गेडाम होते.यावेळी विदर्भ साहित्य संघ शाखा गोंदिया तर्फे मंचावर मोहन देशपांडे ,संजीव बापट उपस्थित होते.विदर्भ साहित्य संघ शाखा गोंदियाचे सचिव  प्रदीप व्यवहारे, सांस्कृतिक समितीचे संयोजक गौरव धोटे, संजय निसळ,किंजल मेहता, केंद्रीय कार्यकारिणी सदस्य डॉ राजश्री धामोरीकर,स्वाती पिंपळापुरे, भैरवी देशपांडे आदीनी परिश्रम घेतले.विद्यार्थी,शिक्षक व पालक वर्गाची या कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैरवी देशपांडे व किंजल मेहता यांनी केले.