आमगाव,दि.0४ःभवभूती शिक्षण संस्थेच्या वतीने संस्थेचे संस्थापक शिक्षण महर्षी स्व. लक्ष्मणराव मानकर गुरुजी जयंती समारोहाचे आयोजन आज, ४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात करण्यात आले आहे.समारोहाचे उद्धाटन आ. विनोद अग्रवाल यांच्या हस्ते आ. विजय रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली होईल. मार्गदशक म्हणून भाजपा विदर्भ क्षेत्र संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर राहणार आहे. या प्रसंगी आ. सहसराम कोरोटे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. याप्रसंगी विविध क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणार्या व गुरुजींच्या राजकीय व सामाजिक कार्यात सहकारी असणार्या व्यक्तींचा सत्कर करण्यात येणार आहे. तसेच भवभूती शिक्षण संस्थेतंर्गत शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावणार्या विद्यार्थी व शिक्षकांचाही यावेळी सत्कर करण्यात येईल. सोबतच गोंदिया येथील संघी परिवारातर्फे दिला जाणारा संघी टॉपर्स अवॉर्डचेही यावेळी वितरण करण्यात येणार आहे. या समारोहाला मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भवभूती शिक्षण संस्थेच्या वतीने करण्यात आले आहे.





