जिल्हा बॅंकेच्या अध्यक्षपदी प्रंचित पोरेड्डीवार

0
19

गडचिरोली दि. १2 : जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या अध्यक्षपदी प्रंचित अरविंद पोरेड्डीवार यांची अविरोध निवड करण्यात आली.जिल्हा बॅंकेच्या २0 संचालकांची नुकतीच अविरोध तर एका संचालकाची निवडणुकीद्वारे निवड झाली होती. या बॅंकेवर सहकार महर्षी अरविंद सावकार पोरेड्डीवार यांच्या गटाचे संपूर्ण २१ संचालक निवडून आले आहेत. जिल्हा बॅंकेला नुकताच कै. वैकुंठभाई मेहता राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार देऊन राज्य बॅंकेने गौरविले आहे. बॅंकेचे जिल्ह्याच्या विकासात मोठे योगदान असून विश्‍वासार्हता कायम ठेवली आहे. आज पार पडलेल्या पदाधिकारी निवडणुकीत विद्यमान अध्यक्ष प्रंचित पोरेड्डीवार यांची फेरनिवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष श्रीहरी भंडारीवार व मानद सचिवपदावर अनंता साळवे यांची अविरोध निवड झाली असल्याची माहिती जिल्हा नागरी बॅंकेचे अध्यक्ष प्रकाश पोरेड्डीवार यांनी दिली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी सतीश आयलवार, मुख्य व्यवस्थापक अरुण निंबेकर आदी उपस्थित होते.