40.3 C
Gondiā
Sunday, June 21, 2026
Home क्रीडा नागपूर व राजनांदगाव कबड्डी संघ ठरले भजेपार चषकाचे मानकरी

नागपूर व राजनांदगाव कबड्डी संघ ठरले भजेपार चषकाचे मानकरी

0
41

सालेकसा,दि.05ःतालुक्यातील भजेपार येथील सूर्योदय क्रीडा मंडळाद्वारे आयोजित आंतरराज्यीय महिला व पुरुष कबड्डी स्पर्धा भजेपा चषकाचे नागपूर व राजनांदगाव संघ मानकरी ठरले. या स्पर्धेत अनेक राज्यातील आंतरराष्ट्रीय कबड्डीपटूंसह प्रो-कबड्डी खेळाडूं आकर्षणाचे केंद्र ठरले.
तीन दिवस चाललेल्या या कबड्डी स्पधेर्चा समारोपीय कार्यक्रमाला माजी आ. संजय पुराम, आमगांवचे उपसभापती जयप्रकाश शिवणकर, पंस सदस्य हिरालाल फाफनवाडे., देवेंद्र चुटे, गजेंद्र फुंडे, सरपंच सखाराम राऊत, उपसरपंच कैलाश बहेकार, पृथ्वीराज शिवणकर, श्यामराव दोनोडे., पवन पाथोडे., डॉ. अजय उमाटे डॉ. संजय देशमुख, वंदना काळे, किरण कोरे, संध्या फुंडे आदी प्रामुख्याने उपस्थित होते. पुरुष गटात प्रथम पारितोषिक नागपूरच्या एकलव्य क्रीडा मंडळाने पटकाविले. द्वितीय पुरस्कार छत्तीसगढ राज्याच्या बालोद समूहाने, तृतीय नागपूर सीटी पोलीस संघ व चतुर्थ पुरस्कार छत्तीसगडच्या कलेवा येथील जयस क्लबने पटकाविला. महिला गटात प्रथम पुरस्कार छत्तीसगड राज्याच्या राजनांदगाव येथील नगर समूहाने, द्वितीय नागपूरच्या साई मंडळ, तृतीय नागपूर रेंज पोलीस व चतुर्थ पुरस्कार छत्तीसगडमध्ील भिलाईच्या स्पोटिर्ंग क्लबने पटकाविला. या संघाटना रोख पुरस्कार, स्मृतिचषक व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
याशिवाय संपूर्ण स्पर्धेत उत्कृष्ट प्रदर्शन करणाड्ढया खेळाडू मॅन ऑफ द सिरीज, बेस्ट रेडर, बेस्ट डिफेंडर, बेस्ट ऑल राऊंडर, प्लेअर ऑफ द डे आदी पुरस्कार देऊन खेळाडूंना गौरविण्यात आले. स्पर्धेच्या आयोजनासाठी विनोद ब्राम्हणकर, विवेकानंद मेंढे, अतुल मेंढे, संदीप पाथोडे., अविनाश बहेकार, डिलेश बहकार यांच्यासह सूर्योदय मंडळच्या सदस्यांसह ग्रामपंचायत, स्वामी विवेकानंद अध्ययन कक्ष, श्री गुरुदेव सेवा मंडळ, शाळा व्यवस्थापन समिती तसेच भजेपार ग्रामवासीयांनी परिश्रम घेतले.