वाशिम, दि. ०7 : महिला व बाल विकास विभागाच्या एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक केंद्र, शासकीय रुग्णालयात गरोदरपणाची नोंद केलेल्या व त्याठिकाणी प्रसृत होणाऱ्या महिलांना पहिल्या प्रसृतीच्या वेळी त्यांच्या नवजात बालकांसाठी शासनातर्फे बेबी केअर कीट देण्यात येते. त्यानुसार ५ फेब्रुवारी २०२० रोजी जिल्हा सामान्य रुग्णालयात प्रसृती झालेल्या शहरी भागातील महिलांच्या बालकांना बाल विकास प्रकल्प अधिकारी कार्यालयामार्फत बेबी केअर कीटचे वितरण करण्यात आले.
अंगणवाडीसेविकांमार्फत गरोदर महिलांची गृहभेट घेवून नोंद करून त्यांना गरोदरपणात करावयाची देखभाल, आहार, लसीकरण आणि प्रसृती पूर्व मार्गदर्शन केले जाते. अशा प्रकारे नोंद झालेल्या व प्राथमिक केंद्र अथवा शासकीय रुग्णालयात प्रसृती होणाऱ्या महिलांना पहिल्या प्रसृतीच्या वेळी त्यांच्या नवजात बालकांसाठी शासनातर्फे बेबी केअर कीट देण्यात येते. त्यानुसार सामान्य रुग्णालयातील प्रसृती वार्डमध्ये ५ फेब्रुवारी रोजी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अंबादास सोनटक्के व बाल विकास प्रकल्प अधिकारी तथा महिला व बाल विकास अधिकारी सुभाष राठोड यांच्या हस्ते बेबी कीटचे वितरण करण्यात आले. यावेळी मेट्रन, वार्ड इन्चार्ज, मुख्य सेविका सुरेखा जाधव, सह मुख्य सेविका सुरेखा राठोड यांची उपस्थिती होती.





