गोंदिया ,दि.10:: जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती गोंदिया येथे सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात (12 वी विज्ञान शाखा) ज्या विद्यार्थ्यांनी 13 नोव्हेंबर 2019 पर्यंत विद्यार्थी/पालक/महाविद्यालय यांचेमार्फत जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी अर्ज सादर केले होते त्या अर्जदारांचे जात वैधता प्रमाणपत्र (त्रुटीची प्रकरणे वगळून) तयार झाले असून जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, सामाजिक न्याय भवन, जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मागे, गोंदिया येथे मूळ पोचपावती, मूळ ओळखपत्र, जात प्रमाणपत्र मूळ व छायाप्रतसह येवून आपले प्रमाणपत्र कार्यालयीन वेळेत घेवून जावे. तसेच ज्या विद्यार्थ्यांचे अर्ज त्रुटीत आहे अशा विद्यार्थी/पालक यांनी 11 फेब्रुवारी 2020 ला त्रुटी पुर्तता शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. तरी अर्जदारांनी मुळ कागदपत्रे व आवश्यक पुरावेसह हजर राहून त्रुटी पुर्तता करावी. असे आवाहन उपायुक्त तथा सदस्य, जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया यांनी केले आहे.




