गोंदिया,दि.11: शाळेत स्वयंपाक करणार्या महिलांना वेतन देण्यात यावे, या प्रमुख मागणीसह एकूण ७ हून अधिक मागण्यांना घेऊन आज (दि.१०) शालेय स्वयंपाकी महिला संघाच्या वतीने जि.प. कार्यालयासमोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. दरम्यान शासनाच्या धोरणा विरुद्ध निदर्शनेही करण्यात आले. यावेळी विविध मागण्यांचे निवेदन जि.प. मुकाअ. यांना देण्यात आले.
शालेय स्वयंपाकी महिलांना १० महिन्या ऐवजी १२ महिन्याचे नियमित वेतन देण्यात यावे, महिलांना सेवेतून कमी करतांना योग्य कार्यप्रणालीचा वापर करण्यात यावा, किमान वेतन लागू करण्यात यावे, शालेय व्यवस्थापन समितीला असलेला नियुक्तीचा अधिकार काढण्यात यावा, नव्याने स्वयंपाकी महिला नियुक्तीचा अधिकार शासनस्तरावर करण्यात यावा, पटसंख्या कमी झाल्याने तेथील स्वयंपाकी महिलांना इतर ठिकाणी समायोजन करण्यात यावे आदी मागण्यांना घेऊन आज महाराष्ट्र राज्य शालेय स्वयंपाकी महिला संघाच्या नेतृत्वात जि.प. कार्यालया समोर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले. त्यातच शासना विरुद्ध निदर्शनेही करण्यात आले. उपोषण कर्त्याच्या शिष्टमंडळाने विविध मागण्यांचे निवेदन जि.प. मुकाअ. मार्फत शासनाला दिले. या उपोषणात जिल्ह्यातील शालेय स्वयंपाकी महिला मोठ्या प्रमाणात सहभागी झाल्या होत्या.





