आमगाव,दि.12ः-ओबीसी संघर्ष कृती समिती गोंदिया जिल्हा,राष्ट्रीय ओबीसी महासंघ,ओबीसी सेवा संघ व ओबीसी अधिकारी-कर्मचारी महासंघाच्यावतीने जनगणनेत ओबीसींचा रकाना तयार करण्यात यावा या मागणीला घेऊन 5 फेबुवारीपासून निघालेल्या ओबीसी जनगणना जागृती यात्रेचे आगमन आमगाव तालुक्यात उद्या गुरुवारला(दि.13) होणार आहे.ओबीसी संघर्ष कृती समितीचे जिल्हाध्यक्ष बबलू कटरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या या यात्रेने अर्जुनी मोरगाव,सडक अर्जुनी,देवरी व सालेकसा तालुक्यात जनजागर केल्यानंतर उद्या सकाळी आमगाव तालुक्यातील पदमपूर येथे सकाळी 9 वाजता दाखल होणार आहे.
रथयात्रेचे आगमन 13 फेब्रुवारी गुरुवारला सकाळी नऊ वाजेपासून होणार असून तालुक्यातील पदमपुर — बामणी- बोरकन्हार- अंजोरा – कवडी- वडद- सोनेखारी- तिगाव तिगाव- फुक्कीमेटा- जामखारी – बिरसी – गोरठा- ठाणा या गावामंध्ये जाऊन जनजागृती करणार आहे.शेवटची सभा ठाणा येथे झाल्यानंतर यात्रेचा रात्रीचा मुक्काम आमगाव येथे राहणार आहे.शुक्रवार 14 फेब्रुवारी शुक्रवारला सकाळी दहा वाजता तालुका कार्यालया समोर सभा व दुपारी एक वाजेपासून किकरीपार – कालीमाटी- भोसा- सुपलीपार- करंजी- सितेपार – चिरचाळबांध- दहेगाव या गावाकडे रवाना झाल्यानंतर रात्रीला गोरेगाव तालुक्यात आगमन होईल.
सर्व ओबीसी समाज बांधवांना आवाहन करण्यात येते की आपल्यातील भीती / न्यूनगंड/ गैरसमज ( असल्यास ) बाजूला ठेवून प्रत्यक्ष सहभाग दर्शवून व जनगणना जागृती अभियान तालुक्यात यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन ओबीसी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष लिलाधर गिर्हेपुंजे,ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष हरिष ब्राम्हणकर,संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष क्रांती ब्राम्हणकर यांच्यासह प्रा.बी.एम.करमकर,प्रा.काशीनाथ हुकरे,विनायक येडेवार,सावन कटरे,गुरुदास येडेवार,नरेंद्र शिवणकर,भुमेश शेंडे,दिनेश तिरेले यांच्यासह ओबीसी संघर्ष कृती समिती,ओबीसी सेवा संघ,संभाजी ब्रिगेड,मराठा सेवासंघासह बहुजन संघटनाच्यावतीने करण्यात आले आहे.





