गोंदिया,दि.18-स्वातंत्र्यपूर्व काळात सुविधांचा अभाव असताना इंग्रज १९३१ मध्ये या देशातील नागरिकांची जातीनिहाय जनगणना करू शकतात,तर सध्याच्याकाळात सर्वप्रकारच्या सुविधा उपलब्ध असताना ओबीसींची जनगणना करण्यास सरकार टाळाटाळ करुन या प्रवर्गातील जातींच्या विकासात अडसर निर्माण करीत आहे.त्यामुळे आपली जातनिहाय जनगणना सरकारने करावी यासाठी दबावगट निर्माण करण्यासाठी समाजबांधवानी संघटित होऊन एकत्र येत जनगणना सरकार करत नसेल तर त्यावर बहिष्कार घालत घरी आलेल्या प्रगणकाला परत पाठविण्याची तयारी समाजबांधवांनी ठेवावी असे आवाहन राष्ट्रीय पोवार क्षत्रिय महासभेचे संघटन सचिव खेमेंद्र कटरे यांनी केले.ते तालुक्यातील मुर्री व फुलचुर येथे आयोजित राजाभोज पोवारसंघ राजभोज जयंतीउत्सव कार्यक्रमात प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होते.
कार्यक्रमाच्या मुर्री येथील अध्यक्षस्थानी माजी जि.प.सदस्य संजय टेंभरे तर उदघाटक म्हणून पवार क्षत्रिय महासभेचे अध्यक्ष इंजि.मुरलीधर टेंभरे तर फुलचूर येथील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पवार क्षत्रिय महासभेच्या युवा समितीचे अध्यक्ष प्रल्हाद पटले होते. तर उद्घाटक म्हणून पवार क्षत्रिय संघटन पौंडीचे अध्यक्ष शरणागत होेते.अतिथी म्हणून कुमेश्वर भगत,अॅड.राजकुमारी कटरे,राजेश अंबुले,पप्पू पटले,नेतराम गौतम,प्रवेश बिसेन, अशोक हरिणखेडे, कुलदिप रिनायत, सरपंच ओकांर रहागंडाले, भुवन रिनायत तर फुलचूर येथील कार्यकमाला माजी सभापती स्नेहा गौतम, पुस्तकलाबाई पटले, पवार प्रगतीशील मंच अध्यक्ष एॅड.पृथ्वीराज चव्हाण, राजेश चव्हाण, से.नि.शिक्षक के.एल.बिसेन,जी.पी.बिसेन, एम.ए.ठाकूर, शिशिर कटरे, दुर्गेश रहागंडाले, दिनेश हरिणखेडे,महेंद्र बिसेन, मनोज टेंभरे, टी.डी.बिसेन, सुभानराव रहागंडाले, लक्ष्मीबाई कटरे, महेश अंबुले, देवचंद बिसेन, गुणराज ठाकरे, सुनिता बघेले, संतोष चौधरी, बी.एल.पटले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना कटरे म्हणाले की हजारोवर्षापुर्वी आपल्या समाजाची जी परिस्थिती होती,ती आजच्या घडीला तशी नाही.आपण लढवय्ये समाजाचे असलो तरी सध्याच्या परिस्थितीत आपल्या गावखेड्यातील समाजबांधवाच्या राहणीमानातील सर्व परिस्थितीचा विचार केल्यास आपण ओबीसी प्रवर्गात मोडत असून मागासलेले आहोत. त्यामुळे आपल्याला प्रगतीसाधावयाची असेल तर सqवधानिक पद्धतीने लढाई लढून आपल्या समाजाती जातीनिहाय जनगणना करण्यासाठी सरकारवर दबाव निर्माण करावा लागेल.जोपर्यंत आपली जनगणना होणार नाही, तोपर्यंत आपली संख्या निश्चित होणार नाही.संख्या निश्चित नसली की सरकारही त्यावर विकासाचे नियोजन करीत नाही,याकरिता आपली जनगणना होणे गरजेचे आहे.दुर्गेश रहागंडाले यांनीही समाजबांधवानी ओबीसी लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन करीत आपल्या बोलीभाषेला सुध्दा स्थान देण्याची मागणी केली.पृथ्वीराज चव्हाण, राजेश चव्हाण, मनोज टेंभरे, शरणागत यांनीही विचार व्यक्त केले. प्रल्हाद पटले यानी समाजातील बांधवानी गट तयार करुन आपली आर्थिकप्रगती साधावी त्यामाध्यमातून पैसा गोळा करुन समाजबांधवाना सहकार्य करावे असे आवाहन केले.फुलचूर येथील कार्यक्रमात इंजि.मुरलीधर टेंभरे यांनी सर्व ग्राम संघटनांना महासभेचे सदस्य होण्याचे आŸवाहन केले. प्रास्ताविक अशोक हरिणखेडे, राजेश अंबुले यांनी केले.आयोजनासाठी महेंद्र पारधी, अमर पटले,भुपेंद्र बघेले,सुखचंद येळे, महेश कटरे, पप्पू बिसेन, सुनिल कटरे,राजकुमार बघेले, मनिष बघेले,प्रदिप टेंभरे, देवेंद्र गौतम, संदिप येडे, मितेश पटले, आनंद येडे, मनोज रहागंडाले, ईशा गौतम, सुनिता ठाकरे, सरस्वती रहागंडाले, रुपाली अंबुले, ज्योती बघेले, निशा पटले,वनिता बिसेन आदीनी सहकार्य केले.




