38.1 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home विदर्भ  कालीमाटी येथे धम्मसंमेलन व शिवजयंती उत्सव आज

 कालीमाटी येथे धम्मसंमेलन व शिवजयंती उत्सव आज

0
40
बौद्ध धम्मगुरू  आर्य नागार्जुन सुरेई ससाई देणार धम्मदीक्षा
गोरेगाव,दि.19 : तालुक्यातील  कालीमाटी येथील डॉ़  बाबासाहेब आंबेडकर  चौक परिसरात बौद्ध धम्मसंमेलन व शिवाजी जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन बुधवारी (१९ फेबु्रवारी) करण्यात आले आहे़ या कार्यक्रमात बौद्ध धम्मगुरू आर्य नागार्जुन सुरेई ससाई यांच्या हस्ते धम्मदीक्षा सोहळा होणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी  एम़ बी़ पटेल महाविद्यालयाचे संचालक कैलास डोंगरे तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाध्यक्ष विजय वासनिक, इंजि़ आनंद चंद्रिकापुरे, विनोद जांभूळकर, बोधानंद गुरुजी, एच़ एऩ शहारे, एम़ एम़ टेंभुर्णीकर, देवेश असाटी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रबोधनकार व गायक अनिरुद्ध वनकर यांच्या भीमगीतांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे़ समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी पालकमंत्री राजकुमार बडोले राहतील.
कार्यक्रमाचे उद्घाटन समाजकल्याण सभापती विश्वजीत डोंगरे यांच्या हस्ते होणार आहे़ यावेळी आ. विनोद अग्रवाल, आ़ मनोहर चंद्रिकापुरे, आ़ सहेषराम कोरोटे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. मुख्य अतिथी म्हणून  पोलीस निरीक्षक एस़ आऱ नारनवरे राहतील. विशेष अतिथी म्हणून पोलीस उपनिरीक्षक तेजेंद्र  मेश्राम, सविता  रामटेके, आशुतोष कांबळे,  निहाल  नायगवळी  हे  राहणार आहेत़ प्रमुख  पाहुणे म्हणून ज्योती वालदे, उषा शहारे, श्याम निमगडे, दिलीप  चौधरी, पुष्पराज जनबंधू, राजेश वासनिक राहतील.
कार्यक्रमाचे मार्गदर्शक म्हणून  संभाजी  ब्रिगेडचे  जिल्हाध्यक्ष  अनिल भुसारी, बिरसा बिग्रेडचे जिल्हा संघटक  चेतन उईके राहणार आहेत़ यशस्वितेसाठी रमाबाई आंबेडकर महिला समिती, कालीमाटी येथील अध्यक्ष सोनाली साखरे, उपाध्यक्ष इश्नुकला राऊत, सचिव रेमलता नांदगाये, कोषाध्यक्ष नीता राऊत, मंगला साखरे, विद्या राऊत, मनोरमा रामटेके, सुलोना साखरे, प्रतिमा नांदगाये आदींचे सहकार्य लाभत आहे.