गडचिरोली,दि.19: गडचिरोली, आरमोरी व धानोरा तालुक्यातील csc व आपले सरकार सेवा केंद्र संचालक यांचे महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या आधार ऑथेंटिकेशन चे प्रशिक्षण शिबीर जिल्हाधिकारी श्री. सिंगला व जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. राठोड यांचे उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडले. मा. जिल्हाधिकारी यांनी योजना राबवतांना मानवीय दृष्टिकोन ठेऊन लाभार्थी शेतकऱ्यांना सौजन्याची वागणूक देऊन योजना यशस्वी करण्याचे आवाहन केले व सदर सुविधेसाठी साठी शासन केंद्र संचालकांना आर्थिक खर्च प्रतिपूर्ती करणार असल्याने लाभर्थांकडून केंद्र संचालकांनी कोणताही मोबदला न घेण्याचे आदेश दिले. श्री. राठोड यांनी पायलट रन च्या वेळेस धुळे जिल्हात झालेली त्रुटी विषयी माहिती देऊन या त्रुटी आपले जिल्ह्यात होणार नाहीत याची काळजी घ्यावी असे सांगितले. या वेळेस महसूल विभाग तर्फे श्री चव्हाण नायब तहसीलदार, नितीन मस्के सहायक निबंधक यांनी सहकार विभागा तर्फे मार्गदर्शन केले तर मनीष लांबट जिल्हा व्यवस्थापक CSC, रुपेश कांबळे (आरडीडी) यांनी तांत्रिक मार्गदर्शन केले तर सदर प्रशिक्षणाचे नियोजन MahaIt तर्फे जयंत मुकूंदवार जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक, संचालन राहुल बावणे वरिष्ठ सहाय्यक अभियंता यांनी केले.





