38.9 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home विदर्भ दिव्यांगांना निःशुल्क उपकरणे वाटपासाठी नागपूर येथे १ मार्च पासून शिबीर

दिव्यांगांना निःशुल्क उपकरणे वाटपासाठी नागपूर येथे १ मार्च पासून शिबीर

0
43

गोंदिया, दि. १८ : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण व जयपूर येथील भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती आणि नागपूर येथील महावीर इंटरनॅशनल सर्व्हिस ट्रस्टद्वारा नागपूर विभागातील दिव्यांगांना आणि वृद्धांना आवश्यकतेनुसार उपकरणांचे निःशुल्क वितरण करण्यात येणार आहे. याकरिता नागपूर येथील आमदार निवास परिसरात १ ते ७ मार्च २०२० दरम्यान सकाळी ११ ते ७ वाजेपर्यंत शिबिराचे आयोजन करण्यात आल्याचे वाशिम जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत कळविण्यात आले आहे.

दिव्यांग व वृद्धांना आवश्यकतेनुसार तीनचाकी सायकल, व्हीलचेअर, कृत्रिम अवयव जयपूर पाय, कृत्रिम हात, कॅलिपर्स, कुबड्या, शूज, बेल्ट, स्वरयंत्र, वृद्धांकरिता छडी इत्यादी उपकरणांचे निःशुल्क वाटप करण्यात येणार आहे. शिबिरामध्ये आवश्यकतेनुसार साहित्य वाटपासाठी दिव्यांग, वृद्धांची निवड केली जाईल. तरी ग्रामसेवक, सरपंच, पंचायत समिती सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, अंगणवाडी कार्यकर्ता, सामाजिक कार्यकर्ता व संस्था यांनी आपल्या क्षेत्रामधील दिव्यांग आणि वृद्ध यांची जिल्हा विधी सेवा प्राधिकरणमार्फत शिबिराकरिता नोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

निवड झालेल्या लाभार्थ्यांनी सोबत आधारकार्ड, मतदान कार्ड, रेशनकार्ड यापैकी कोणत्याही एका ओळखपत्राची छायांकित प्रत, त्यावर मोबाईल क्रमांक लिहून सोबत आणावी. ज्यांना मागील तीन वर्षामध्ये तीनचाकी सायकल अथवा व्हील चेअर मिळालेली आहे, त्यांनी शिबिरामध्ये सहभागी होवू नये. अधिक माहितीसाठी गोंदिया जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा व सत्र न्यायालय, गोंदिया येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा विधी सेवा प्राधिकरणचे सचिव यांनी केले आहे.