30.6 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home विदर्भ शेतमजूर संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

शेतमजूर संघटनेचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

0
37

गोंदिया,दि.21ःशेतमजूर व कष्टकरींच्या विविध मागण्यांसाठी लाल बाटवा शेतमजूर संघटनेच्या नेतृत्वात २0 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. दरम्यान मागण्यांचे निवेदन मुख्यमत्र्यांच्या नावे जिल्हाधिकाड्ढयांना देण्यात आले.
शेतमजूर संघटनेचे जिल्हाध्यक्ष हौसलाल रहांगडाले यांच्या नेतृत्वात फुलचूर नाका येथून मोर्चा काढण्यात आला. यावेळी मोठ्या संख्येने शेतमजूर व कष्टकरी उपस्थित होते. जिल्हाधिकाड्ढयांना दिलेल्या निवेदनात, गोंविद पानसरे यांच्या खुनाच्या आरोपींना अटक करुन कठोर शिक्षा द्यावे. अतिक्रमण व वन जमिनीचे पट्टे कब्जाधारकांच्या नावावर करा. महात्मा गांधी रोजगार अंमलबजावनी करा, मनरेगा मजुरांना ५00 रुपये प्रति दिवस मजुरी लागु करा. आवास योजना अंतर्गत ग्रामीण व शहरी लाभार्थ्यांना समान ५ लाख रुपये घरकुला करीता द्या. शेतमजुर, गरीब शेतकड्ढयांना ५ हजार रुपये मासिक पेंशनचा कायदा करा. दुष्काळग्रस्त शेतकड्ढयांनप्रमाणे शेतमजुरांना वषार्ला ६ हजार रुपये लागूू करा. ६0 वर्षावरील मजुरांना ६ हजार पेंशनचा कायदा करा, रेशनकार्डवर सर्व शेतमजुरांना १ रुपये दराने धान्य देण्यात यावे, शेतमजुरांच्या मुलांना चांगले शिक्षण व पदवी पयर्ंत मोफत शिक्षण व आरोग्य सेवा द्या. जिल्ह्यातील अतिक्रमणधारकांना घरकूल मंजूर करण्यात यावे. दलित, आदिवासी, अल्पसंख्यक, ओ.बी.सी. वरील अत्याचार बंद करा आदि मागण्यांचा समावेश आहे.