लाखांदुर,दि.23 : नापिकी व दुष्काळाने बाधित शेतक-यांनी विकविमा काढला, ज्या शेतकरी वर्गाचे कर्जमुक्ती मध्ये नावे आलेली आहेत, अश्या शेतक-यांच्या खात्यात पीकविमा कपात झाला आहे अश्या शेतकNयांना एकाच वेळेस एप्रिल नंतर दोन्ही लाभ मिळणार आहेत. यामध्ये ज्या शेतकNयांना कर्जमुक्ती मिळणार होती अशा शेतकNयांचे पैसे कर्ज खात्यात गेलेले होते. त्यामुळे अशा शेतकNयांना पीकविमा रक्कम मिळणार आहे. अशा जिल्ह्यातील शेकडो शेतकNयांना विकविम्याचा लाभ होणार असे चुलबंद शिवतिर्थावर ११० पुâट हनुमान मुर्तीचे भूमीपुजन व महाशिवरात्री निमित्ताने कार्यक्रमात भंडारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी व्यक्त केले.
लाखांदुर येथील चुलबंध शिवतिर्थावर महाशिवरात्री निमीत्त आयोजीत कार्यक्रमाप्रसंगी अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. ते पुढे म्हणाले, शासनाने कर्जमाफी केली असल्याने पिकविम्याची रक्कम थेट शेतकNयांच्या बचत खात्यात जमा होणार असल्याची माहिती देखील दिली. कर्जबाजारी शेतकNयांना संकटमुक्त करण्याहेतु सहकारी बँका अंतर्गत सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. शासन धोरणानुसार पिकविमा व कर्जमाफी या योजनांची काटेकोर अंमलबजावणी देखील केली जात आहे. जिल्ह्यातील शेकडो शेतकNयांना जवळपास ३९ कोटी रुपये निधीचा पिकविम्या अंतर्गत लाभ होणार असल्याचे देखील सांगीतले. महात्मा जोतिबा फुले कर्जमुक्ती योजना ही राज्य सरकारची योजना असून कर्जमुक्तीमध्ये ज्या शेतकNयांचे पैसे माफ होणार आहेत, अश्या शेतकNयांनी बँकला दोषी ठरवू नये. याबाबतीत कोणतीही तक्रार नाही यायला पाहिजे कारण सर्व माहिती ही पोर्टलवर शासन टाकणार आहे. कोणाचे काही अडचणी असल्यास बँकांना दोषी ठरवू नये. याबाबत माहिती बँक देईल पण कर्जाची खात्री करून घ्यावी, असे कार्यक्रमाप्रसंगी बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे यांनी सांगितले.
जिल्ह्यातील शेकडो शेतक-यांना पीक विम्याचा लाभ होणार : सुनिल फुंडे
चुलबंद शिवतिर्थावर ११० फूट हनुमान मूर्तीचे भूमिपूजन





