अर्जुनी/मोरगाव,दि.23 : तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने महाराष्ट्र शासनाचे विविध क्षेत्रातील व त्यामुळे जनतेचे हित साध्य होत नसल्यामुळे २५ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता एक दिवसीय धरणे आंदोलन स्थानिक तहसील कार्यालयाच्या प्रांगणात होणार आहे, अशी माहिती तालुका भाजप अध्यक्ष तथा पंचायत समिती सभापती अरविंद शिवणकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, शेतकर्यांची फसवणूक आणि महिलांवरील वाढत्या अत्याचाराच्या निषेधार्थ हे भाजपचे धरणे आंदोलन आहे. जनादेशाचा अपमान करून सत्तेवर आलेल्या शिवसेना- काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी सरकारने शेतकर्यांची फसवणूक केली. आघाडी सरकारच्या दुर्लक्षामुळे राज्यात महिलांवरील अत्याचार वाढले आहेत. भाजपाचा विश्वासघात करून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर शिवसेनेने सत्ता स्थापन करून शेतकर्यांचा विश्वासघात केला सरकार स्थापन करीत असताना शिवसेनेच्या पक्ष प्रमुखांनी आणि आत्ताच्या मुख्यमंत्र्यांनी तसेच काँग्रेस-राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी शेतकर्यांच्या बांधावर जाऊन अवकाळी ग्रस्तांना २५ हजार रुपये हेक्टरी आणि फळबागांसाठी ५० हजार रुपये हेक्टरी मदत देण्याची घोषणा केली होती. पण हा विकास आघाडी सरकारच्या प्रमुखांना आपल्या आश्वासनांचा विसर पडला आहे. सरसकट कर्जमाफी करू सातबारा कोरा करू अशा घोषणा करणार्या महाविकास विकास आघाडीच्या नेत्यांनी यापैकी एकही आश्वासन पाळलेले नाही, ही सरकारची कर्जमाफी योजना शेतकर्यांची फसवणूक करणारी आहे. महा विकास आघाडी सरकारने शेतकर्यांची फक्त अल्पमुदतीची आहे पिक कर्ज माफ करण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे बहुसंख्य शेतकर्यांना या कर्जमाफीचा फायदा मिळणार नाही. दोन लाखांवर कर्ज असलेल्या तसेच कर्जाची नियमित परतफेड करणार्या शेतकर्यांबाबत महा विकास आघाडीच्या कर्जमाफी योजनेत कसलाच उल्लेख नाही तसेच राज्यातील महिलांवरील अत्याचारांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे, महिलांवर अत्याचार करणार्या गुन्हेगारांना धाक बसविण्यास ऐवजी महा विकास आघाडी सरकारचे मंत्री गावोगावी सत्कार घेण्यात व्यस्त आहेत हे सरकार सत्तेवर आल्यानंतर गुन्हेगारांना कायद्याचा धाक उरलेला नाही हिंगणगाव येतील सध्या केला जिवंत जाळण्याच्या घटनेने संपूर्ण देश हादरून गेला आहे. अॅसिड हल्ला अल्पवयीन मुलींवर अत्याचार बलात्कार महिलांना जाळून टाकले अशा घटना वाढू लागल्यामुळे महिला व तरुण मुलींमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भाजपा सरकारच्या शेतकर्यांसाठी जलयुक्त शिवार योजना तसेच मुख्यमंत्री शाश्वत सिंचन योजना अशा उपयुक्त योजनांना या महाविकास आघाडी सरकारने स्थगिती दिल्याने शेतकर्यांवर अन्याय झाला आहे तसेच भाजपा सरकारच्या काळात असंघटित कामगारांसाठी सुरु असलेली इमारत बांधकाम व कल्याण योजना नोंदणी बंद केली. त्यामुळे असंघटित कामगारांना न्याय झाला आहे. केसरी कार्डधारकांना रेशन देण्यात यावा, कृषीपंपाचे वीज देयके माफ करण्यात यावे व डिमांड भरलेल्या शेतकर्यांना त्वरित विद्युत पुरवठा करण्यात यावा, घरकुल कामांसाठी भाजपा सरकार पाच ब्रास रेती पुरवठा करत होती तीसुद्धा विकास आघाडी शासनाने बंद केल्याने बांधकाम करणार्यांवर अन्याय झाला आहे. अशा इतर अनेक मागण्यांच्या संदर्भाने २५ फेब्रुवारीला भारतीय जनता पार्टी अर्जुनी-मोरगावच्या वतीने तहसील कार्यालयाच्या प्रांगणात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. या धरणे आंदोलनाला तालुक्यातील जनतेने हजारोच्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.




