लाखनी,दि.08ःभंडारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने येणाऱ्या काळात पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या अनुषंगाने पोहरा जिल्हा परिषद क्षेत्राची बैठक पोहरा येथे लाखनी तालुका काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून पार पडली. भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष प्रेमसागरजी गणवीर यांच्या अध्यक्षतेमध्ये आणि जिल्हा उपाध्यक्ष शफीभाई लद्धानी, महासचिव तथा लाखनी तालुका निरीक्षक अनिकजामा पटेल,दिलीप निखाडे,लाखनी तालुका अध्यक्ष राजु निर्वाण, माजी तालुका अध्यक्ष सुनिल गिरेपुंजे, युवक काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रशांत वाघाये, लाखनी पं. स. सभापती खुशाल गिदमारे, माजी जि.प. सदस्य जयकृष्ण फेंडरकर, उमराव आठोडे, जि.प. क्षेत्र प्रमुख दिलीप अंबादे, पं. स. क्षेत्र प्रमुख देविदास गिरेपुंजे, नरेंद्र झलके, सरपंच जिजा तुमडाम, सरपंचा संगिता घोनमोड़े, विणा नागलवाड़े, लता शेंडे, उपसरपंच जितेंद्र दोनोडे, यशवंत खेडीकर, प्रकाश अंडेल, रामचंद्र बोरकर, हेमंत बड़वाईक येथील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. पोहरा क्षेत्रातील सर्व गावातील काँग्रेस पक्षाचे प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.
सदर बैठकीमध्ये गाव समितीतील पदाधिकाऱ्यांची नेमणूक करण्या संदर्भात पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा करण्यात आली. जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी मार्गदर्शन केले तसेच आजवरच्या कार्याचा आढावा घेतला. या माध्यमातून गावागावात आपले संघटन तयार करा, ग्राम काँग्रेस कमिटी बनवून समितीच्या वतीने गावाच्या सुरुवातीला दर्शनी भागावर स्वागत फलक लावा. लोकांना काँग्रेसने केलेले कार्य पटवून दया, सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवन्याच्या दृष्टीने सदैव प्रयत्नशील रहा असे मनोगत व्यक्त केले.
या बैठकीमध्ये लाखनी तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष प्रशांत वाघाये यांनी महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी नुकत्याच सादर झालेल्या अर्थसंकल्पात साकोली येथे १०० खाटांचे विस्तारित उपजिल्हा रुग्णालय मंजूर केल्याबद्दल तसेच शासकीय कृषी महाविद्यालय मंजूर केल्याबद्दल अभिनंदनाचा ठराव मांडला आणि सर्वानुमते तो एकमताने मंजूर करण्यात आला.
या बैठकीला जि. प. क्षेत्रातील सर्व गावांचे काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. एकूणच राज्यात सत्तेत असलेला काँग्रेस पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी जोमाने पूर्वतयारी करतांना करत दिसत आहे.





