37.6 C
Gondiā
Friday, June 19, 2026
Home विदर्भ देवरी तालुका पत्रकार संघाने केला महिलांचा सत्कार

देवरी तालुका पत्रकार संघाने केला महिलांचा सत्कार

0
51
देवरी,दि.08 – आज रविवारी जागतिक महिला दिनाचे औचित्या साधून देवरी तालुका पत्रकार संघाच्या वतीने कर्तृत्वान महिलांचा सत्कार करण्यात आला.
तालुका पत्रकार संघाच्या कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष  अड. प्रशांत संगीडवार हे होते. यावेळी देवरी नगरपंचायतीचे उपाध्यक्ष अन्नू शेख तर सत्कारमूर्ती जि.प.सदस्य तखा जिल्हा महिला कॉंग्रेसच्या उषा शहारे, सरिता काळसर्पे आणि जसवंतकौर भाटीया उपस्थित होते.
श्रीमती शहारे यांचा सामाजिक आणि राजकीय कार्यातील वाटचाल आणि या क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. तर श्रीमती भाटीया आणि काळसर्पे यांनी पतीच्या अकाली निधनानंतर  डगमगून न जाता परिस्थितीचा खंबीरपणे सामना केला. मोलमजूरी करून आपली मुले सासू सासरे यांचे पालनपोषण, शिक्षण आणि लग्न आदी कार्य त्यांनी स्वकर्तृत्वाने पार पाडली. त्यांच्या या धाडसाबद्दल त्यांचा कार्याला पत्रकारसंघाच्या वतीने सलाम करण्यात आला.
सत्कारमूर्तीचा मान्यवरांचे हस्ते शालश्रीफळ आणि साडी देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी सत्कारमूर्तींनी सत्काराला उत्तर देताना महिलांनी आजच्या युगात आपला दृष्टीकोन बदल्याची गरज असल्याचे प्रतिपादन केले. आलेल्या परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जाण्याचे धैर्य महिलांनी दाखविले पाहिजे, असेही त्यांनी आपल्या उत्तरात म्हटले.