37.6 C
Gondiā
Friday, June 19, 2026
Home विदर्भ सावित्रीचे वर्तन,जिजाऊंचे संस्कार व रमाईचे विचार स्विकारल्याशिवाय महिलांना पर्याय नाही-विमल कटरे

सावित्रीचे वर्तन,जिजाऊंचे संस्कार व रमाईचे विचार स्विकारल्याशिवाय महिलांना पर्याय नाही-विमल कटरे

0
164

गोंदिया,दि.०८ः १०० देशाच्या महिलांनी एकत्र येत १९०८ रोजी आजच्या दिवशी अमरेकितील न्युयार्क येथे जागतिक महिला दिन कार्यक्रमाची सुरवात केली.तेव्हापासून जगात सर्वत्र८ मार्च रोजी महिला दिन साजरा करण्यात येत आहे.मात्र सयुक्त राष्ट्रसंघांने तब्बल ८२ वर्षानंतर ८ मार्च या दिवसाला जागतिक महिला दिवस म्हणून मान्यता दिली असली तरी भारतासह जगभरातील महिलांचे प्रश्न आजही बिकट असून महिलांच्या स्वातंत्र्यावर विविध मुद्यांना समोर आणून गदा आणली जात आहे.जागतिक महिला दिन साजरा करीत आहोत,परंतु आमचे विचार जोपर्यंत जागतिक दज्र्याचे होणार नाहीत,सावित्रीआईसारखे वर्तन व माता जिजाऊसारखे संस्कार मुलांना दिल्याशिवाय आणि समाज अधिकारासाठी लढणाèया रमाईसारख्यांची विचारांची साथ जोपर्यंत आपण घेणार नाही,तोपर्यंत महिलांच्या विचारांना जागतिक दर्जा प्राप्त होऊ शकत नाही.आज संस्कृतीच्या नावावर महिलांना चारभितींच्या आत रहावे अशी रुढीपरंपरा या देशातील काही विशिष्ट लोकांनी तयार करुन समाज घडविण्याची क्षमता असलेल्या महिलांनाच अबला बनिवण्याचेही काम केले आहे.आत्ता मात्र आपण सावित्रीबार्इं,जिजाऊं.रमाईच्या विचारांनी आपल्यात बदल घडवून स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याची गरज असून आपले शत्रु कोण व मित्र कोण याचा विचार करणे काळाची गरज झाल्याचे प्रतिपादन सालेकसा तालुका महिला दक्षता समितीच्या अध्यक्ष विमलताई कटरे यांनी केले.त्या शास्त्री वार्ड येथील यशोदरा सभागृहात पोवार समाजाच्यावतीने आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्रमात मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.
कार्यक्रमाचे उदघाटन अ‍ॅड.कु.भगवती तुरकर यांच्या हस्ते माजी जि.प.सदस्या सीताबाई रंहागडाले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले.यावेळी विशेष पाहूणे म्हणून एक्वायर पब्लिक एज्युकेशन सोसायटी गोंदिया च्या कोषाध्यक्ष सौ.मिनाक्षी कटरे,मार्गदर्शक म्हणून सालेकसा तालुका महिला दक्षता समीतीच्या अध्यक्ष सौ.विमल कटरे,दिव्या भगत(पारधी) मंचावर उपस्थित होत्या.
श्रीमती कटरे पुढे बोलतांना म्हणाल्या की,भारतासह देशविदेशात स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक होती.शिक्षण,पैसा,मतव्यक्त विचार,मतदान,मालमत्तेत कोणताही हक्क नव्हता.एकंदरीत स्त्रियांचे जिवन हे गुलामीचे होते.मात्र १९ व २० व्या शतकात यात मोठी वैचारिक क्रांती निर्माण झाल्याने महिलांना अधिकार प्राप्त झाले.प्रामुख्याने मेरी ओल्सन,रानी व्हिक्टोरिया,एलिझाबेथ,एलियन या विदेशातील महिलासंह भारतातील राजमाता जिजाऊ, सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख केल्याशिवाय होणार नाही.भारतात पहिल्यांदा १ जानेवारी १८४८ रोजी मुलींची पहिली शाळा सुरु करुन सावित्रीबाई फुल्याने महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न केला.परंतु या देशातील स्वयंघोषीत बुध्दीमान असलेल्या एका समाजाने यावर आक्षेप घेत सावित्रीबाईवंर शेणमातीचा मारा केला.तरीही त्यांनी न डगमगता महिलांच्या शिक्षणाची धुरा सांभाळली.आज त्यांच्यामुळेच आम्ही शिक्षित होऊन समाजात वावरण्या योग्य झालो असलो तरी सावित्रीबार्इंच्या विचारांचा अंगीकार मात्र न केल्यानेच पुन्हा महिलांवर या दशकात गुलामगिरीत जाण्याची वेळ येऊ घातली आहे.रंगारंग कार्यक्रम,नाचगाणे यापेक्षाही समाजालाच नव्हे तर आपल्या कुटुबांला महापुरुषांच्या विचारांची गरज असतांना आम्ही जाणिवपुर्वक करीत असलेले दुर्लक्ष भविष्यात आपल्या मुलाबांळासाठी धोकावह ठरू शकते.याकरीता नाचगाण्यापेक्षा इतिहास व सqवधानाचे वाचन आणि समाजात जनजागृतीपर कार्यावर प्रत्येक महिलेंने भर देणे आवश्यक असल्याचेही म्हणाल्या.
पुढे बोलतांना १८९३ मध्ये अमेरिकेत महिला मतदानाच्या अधिकारासाठी आंदोलन करतात.तर १९३२ मध्ये गोलमेज परिषदेत भारतीय महिलांनाही मतदानाचा अधिकार मिळावा म्हणून डॉ.बाबासाहेब आंबेडकर इंग्रजाकडे आपला आवाज बुलंद करुन अधिकार मागतात.त्याचवेळी मात्र qहदू महासभेचे प्रतिनिधी मदन मोहन मालविय हे महिलांच्या मतदानाच्या अधिकाराचा विरोध करतात.काँग्रेसचे महात्मा गांधी याविरोधात उपोषणाला बसतात यावरुन आमच्या महिलांच्या विरोधात कोण होते हे दिसून येते.बाबासाहेब झाले नसते तर आज महिलांना अधिकार मिळाले नसते व महिला या मंचावर येऊन विचारही मांडू शकल्या नसत्या यासाठी बाबासाहेबांचा सत्य इतिहासही सुज्ञ व शिक्षित महिलांनी वाचण्याची गरज आहे.आमच्या अधिकारासाठी आमच्या ओबीसी समाजाची जनगणना होणे गरजेचे आहे.परंतु गेल्या ९० वर्षापासून काँग्रेस व भाजपचे प्रधानमंत्री व सरकार ती करत नाही,कारण आमची संख्या स्पष्ट झाली तर आमच्या संख्येवर कुणी डल्ला मारला हे जगासमोर येईल.हे येऊ नये यासाठी आम्हाला धर्माच्या नावावर गुतंवून आमचे अधिकार व जनगणना हिरावण्याचे षडयंत्र सद्या सुरु आहे.परंतु यासाठी जो लढा सुरू आहे,त्या लढ्यात प्रत्येक महिलेने कुटुंबप्रमुख म्हणून सहभागी होऊन आमची जनगणना नाही तर आमचा जनगणनेवर बहिष्कार हा ब्रिद मनात ठासून घ्यायचे असल्याचे विचारही विमल कटरे यांनी यावेळी व्यक्त केले.तर कार्यक्रमाच्या उदघाटक अ‍ॅड भगवती तुरकर यांनी आम्हा महिलांना पुरुषांच्या बरोबर जगण्याचे अधिकार,वारसाहक्क,पतीच्या सपंत्तीत अधिकार हे भारतीय संविधानाने दिले असल्याचे मत व्यक्त केले.कार्यक्रमाच्या अध्यक्ष सीताबाई रहागंडाले व दिव्या भगत यांनीही आपले विचार यावेळी व्यक्त केले.आयोजनासाठी पोवार समाज महिला समीती शास्त्रीवार्ड गोंदियाच्या अध्यक्षा संगिता रंहागडाले,संयोजिका गिता चौधरी,सचिव आशा रंहागडाले, माधुरी कटरे,भुमिका राणे,अंजु चौधरी,शितल बिसेन,रेखा पारधी,कविता ठाकरे,सुनिता रहागंडाले,गायत्री कटरे,भुमेश्वरी बिसेन,निता तुरकर,रिता कटरे,पुष्पा अंबुले,ओमलता कटरे,भुमेश्वरी पारधी,कविता रहागंडाले,रिता चौधरी,माधवी गौतम व शांता पारधी यांनी सहकार्य केले.संचालन आशू रहागंडाले,स्नेहा गौतम व नुतन बिसेन यांनी केले.तर आभार आशू रहागंडालेनी मानले.

blankपोवार बोर्डिंग येथे महिलादिनी सांस्कृतिक उत्साहात
गोंदिया : पोवार प्रगतीशील मंच अंतर्गत पवार महिला समिती गोंदियाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून ८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता कन्हारटोली येथील पवार सांस्कृतिक भवन येथे आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमीत्त सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात पार पडले.सुरवातीला चक्रवर्ती राजा भोज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन कार्यक्रमाची सुरवात करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय क्षत्रिय पवार महासभेच्या महासचिव  पुष्पा बिसेन होत्या.उद्घाटन राष्ट्रीय पवार क्षत्रिय महासभा महिला समितीच्या अध्यक्षा देविका कटरे यांच्या हस्ते करण्यात आले.तर प्रमुख अतिथी म्हणून मौसम हरिणखेडे, गीता खिलेंद्र हरिणखेडे, चेतना रविकांत बोपचे व गोंदिया बस आगाराचे प्रमुख संजना पटले उपस्थित होते.कार्यक्रमासाठी पवार महिला समिती गोंदियाचे अध्यक्ष सोनाली रहांगडाले, सचिव दिव्या तुरकर, उपाध्यक्ष मेघा बिसेन, शितल रहांगडाले, कोषाध्यक्ष लुकेश्वरी तुरकर, सहसचिव निता बोपचे, संघठन सचिव गोल्डी पारधी, प्रचार सचिव राजश्री रहांगडाले, संयोजिका सौ. रश्मी रहांगडाले यांच्यासह समितीच्या सर्व सदस्यांनी सहकार्य केले.

.