38.1 C
Gondiā
Saturday, June 20, 2026
Home विदर्भ साकोली येथील नवीन कृषि महाविद्यालयासाठी तातडीने जागा निश्चिती

साकोली येथील नवीन कृषि महाविद्यालयासाठी तातडीने जागा निश्चिती

उपजिल्हारुग्णालयाची क्षमता 50 खाटांवरुन 100 खाटांमध्ये वाढविण्याबाबत निविदा प्रक्रिया सुरु करण्याचा विधानसभा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय

0
196

भंडारा,दि.18: – अर्थसंकल्पात घोषित करण्यात आलेल्या साकोली येथील नवीन कृषि महाविद्यालयाच्या निर्मिती संदर्भात तसेच साकोली उपजिल्हारुग्णालयाची क्षमता 50 खाटांवरुन 100 खाटांमध्ये वाढविण्याबाबत आज, दिनांक 18 मार्च, 2020 रोजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली बैठक होऊन त्यात या दोन्ही कामांसदर्भात तातडीने कार्यवाही करणेबाबत सूचना देण्यात आल्या. कृषि मंत्री.दादा भुसे यांनी कृषि महाविद्यालयासाठी निकषानुसार आवश्यक असलेली 30 हेक्टर जागा तातडीने निश्चित करण्यासाठी पाहणी करण्याचे आदेश यावेळी दिले. त्याचप्रमाणे 100 खाटांच्या उपजिल्हारुग्णालयाच्या बांधणी संदर्भात सार्वजनिक आरोग्य विभागाने निधी उपलब्ध व्हावा यासाठी तातडीने वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवावा, सार्वजनिक बांधकाम विभागाने त्वरीत निविदा प्रक्रियेची कार्यवाही सुरु करावी, अशा सूचना नाना पटोले यांनी यावेळी‍ दिल्या.

विधान भवनात झालेल्या या बैठकीस सार्वजनिक आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास, कृषि विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह या विभागांचे अन्य संबंधित अधिकारी उपस्थित होते.  कृषि महाविद्यालयासाठी जिल्हाधिकारी, भंडारा यांच्या अखत्यारितील शासनाकडील जागा निश्चित करण्यात यावी, या संबंधीच्या प्रस्तावाला तातडीने मान्यता देण्यात यावी जेणेकरुन कृषि महाविद्यालय निर्मितीचे काम लवकर सुरु होईल तसेच उपजिल्हारुग्णालयाची क्षमता 50 खाटांवरुन 100 खाटांमध्ये तातडीने परावर्तीत व्हावी यासाठी सार्वजनिक आरोग्य, सार्वजनिक बांधकाम आणि वित्त विभागाने आवश्यक ती कार्यवाही करण्याचे यावेळी निश्चित करण्यात आले.