24.1 C
Gondiā
Tuesday, August 11, 2026
Home विदर्भ यंदा शाळेत महाराष्ट्र दिवस नाही,कोरोना प्रादुर्भावावर उपाययोजना म्हणून घेतला निर्णय

यंदा शाळेत महाराष्ट्र दिवस नाही,कोरोना प्रादुर्भावावर उपाययोजना म्हणून घेतला निर्णय

0
731

गोंदिया,दि.24ः1 मे 2020 रोजी महाराष्ट्र राज्य स्थापन होऊन 60 वर्ष पूर्ण होत आहेत. दरवर्षीप्रमाणे 1 मे महाराष्ट्र दिवस म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात साजरा केला जातो. परंतु यावर्षी कोरोना सारख्या जागतिक पातळीवरील विषाणू मुळे महाराष्ट्र शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार फक्त जिल्हा पातळीवर महाराष्ट्र दिन साजरा केला जाणार आहे. सर्व शाळा, महाविद्यालयात महाराष्ट्र दिवसाचे कार्यक्रम रद्द करण्याचे निर्णय जिल्हा शिक्षण अधिकारी राजकुमार हिवारे यांनी घेतले आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी म्हणून सर्व शाळा आणि महाविद्यालयातील महाराष्ट्र दिवसाचे कार्यक्रम रद्द करण्यात आले असून सर्व गटशिक्षणाधिकारी व खाजगी शाळेतील संस्थापकांना कोणतेही कार्यक्रम आयोजित केले जाऊ नये असे आदेश देण्यात आले आहेत. महाराष्ट्र प्रेमींनी यंदा महाराष्ट्र दिवस घरीच साजरा करून कोरोना पासून सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.