31.3 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ गोंदियात 19 नमुन्यांचा अहवाल बाकी;51 व्यक्ती शासकीय अलगीकरण केंद्रात

गोंदियात 19 नमुन्यांचा अहवाल बाकी;51 व्यक्ती शासकीय अलगीकरण केंद्रात

0
735

गोंदिया दि.28ःजिल्ह्यात कोरोना विषाणूच्या अनुषंगाने आतापर्यंत एकूण 220 व्यकतींच्या घशातील स्त्रावाचे नमुने चाचणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविले होते.त्यापैकी 201 व्यक्तीच्या घशातील स्त्रावांच्या नमुन्याचा चाचणी अहवाल प्राप्त झाला आहे.यामध्ये 200 नमुन्यांचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आला आहे.1 नमुना यापूर्वीच पॉझिटिव्ह आढळून आला आहे.

आज 28 एप्रिल रोजी 2 व्यक्तीच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासणीसाठी नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे.एकूण 19 नमुन्यांचा अहवाल अप्राप्त आहे.26 मार्चला कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेल्या त्या युवकाचा 10 एप्रिल रोजी घशातील स्त्रावाचा चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे त्याला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.जिल्ह्यातील एकमेव कोरोनाबाधित रुग्ण बरा होऊन आज 18 दिवस झाले आहे.या 18 दिवसाच्या कालावधीत एकही नवीन कोरोनाबाधित रुग्ण जिल्ह्यात आढळलेला नाही.

जिल्ह्यातील सात संस्थात्मक अलगीकरण केंद्रात 51 व्यक्ती उपचार घेत आहेत.यामध्ये जिल्हा क्रीडा संकुल- 20 ,एम.एस आयुर्वेदिक कॉलेज,गोंदिया – 2, चांदोरी-18 , येगाव – 1, लिटिल बर्ड कॉन्व्हेंट,नगर परिषद तिरोडा -3, घटेगाव-4 आणि बिरसी उपकेंद्र येथे 3 अशा एकूण 51 व्यक्तींचा समावेश आहे.कोविड विषाणूबाबत माहिती व सल्ला हवा असल्यास हेल्पलाईन क्रमांक.8308816666 आणि 8308826666 यावर संपर्क साधावा. असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.हिंमतराव मेश्राम यांनी केले आहे.