गोंदिया,दि.२८ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २२ मार्च २0२0 नंतर सुरु झालेल्या संपुर्ण बंदच्या परिस्थितीत महावितरणच्या विविध वर्गवारीतील सर्व ग्राहकांच्या विज पुरवठयाविषयी समस्या जाणून घेण्यासाठी महावितरण गोंदिया परीमंडळाच्या वतीने वेबिनारव्दारे ग्राहकांशी संवाद साधण्याचे आयोजन गुरुवार दिनांक २८ मे रोजी दुपारी २ ते ४ वाजेपयर्ंत करण्यात आले होते. परंतू काही अपरीहार्य कारणामुळे वेबिनारव्दारे ग्राहकांशी संवाद या कार्यक्रमामध्ये बदल करण्यात आला असून सदर कार्यक्रम हा शुक्रवार दिनांक २९ मे रोजी दुपारी ४ ते ६ वाजेपयर्ंत आयोजित करण्यात आलेला आहे. ग्राहकांनी याची नोंद घेण्याचे आवाहन महावितरणद्वारे करण्यात आले आहे.
ग्राहकांनी मांडलेल्या तक्रारीचे तात्काळ निरसन करण्यासाठी मुख्य अभियंतासोबत गोंदिया व भंडारा कार्यालयाचे अधिक्षक अभियंते यांच्यासह सर्व कार्यकारी अभियंता, सर्व उपविभागीय अभियंते या वेबिनार संवादात सहभागी होणार आहेत.
वेबिनार संवादात असे सहभागी व्हावे :- वेबिनार संवाद हा सर्व विज ग्राहक, ग्राहक प्रतिनिधी, पत्रकार अशा सर्वांसाठी असल्याने ज्यांना विज समस्या किंवा सुचना मांडावयाच्या आहे त्या सर्वांना महावितरण गोंदिया परिमंडळाच्या वतीने शुक्रवार दि. २९ मे रोजी आयोजित या वेबिनारमध्ये https://meet.google.com/coh-gwzp-hwd लिंकवर क्लिक करुन सहभागी होता येईल.





