29.8 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ गोंदियाच्या विकास कामांना गती द्या – खा. सुनिल मेंढे

गोंदियाच्या विकास कामांना गती द्या – खा. सुनिल मेंढे

0
357

गोंदिया,दि.28 : गोंदिया मोठी व्यापारी बाजारपेठ असली तरी सुद्धा रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी व्यापारी, नागरिकांना छोट्या व अरुंद गल्ल्यांचा वापर करावा लागत आहे. हा विषय अनेक वषार्पासून थंडबस्त्यात दुर्लक्षित पडला आहे. त्यासाठी खा. मेंढे यांनी पुढाकार घेवून उपविभागीय अधिकारी कार्यालय गोंदिया येथे सर्व संबंधितांची बैठक घेतली. सर्व विभागांनी एकत्रित नियोजन करून, रेल्वे स्थानकावर जाणा-या रस्त्याचे रुंदीकरण,रेल्वेतलावाचे सौंदर्यीकरण आणि रेल्वेमार्गावरील रस्त्यावर झालेले अतिक्रमण त्वरीत हटविण्यासंबधात कार्यवाही करण्याचे निर्देश खा. मेंढे यांनी दिले. वैनगंगा नदीच्या पात्राला लागून असलेला कासा गावात दरवर्षी पुर स्थीती निर्माण होते ते दूर व्हावी या दृष्टीने कासा गावातील लोकांच्या पुनर्वसनसंबंधी उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांच्याशी चर्चा करीत तेथील अडचण त्वरीत मार्गी लावण्याचे निर्देश दिले. सिंधी बांधव फाळणीच्या वेळी पाकिस्तानातून निष्कासित होवून देशात वेगवेगळया ठिकाणी स्थायिक झालेत त्यांना निवासासाठी भूखंड देवून त्याची मालकी/ पट्टा देण्यात आला, परंतू वषार्नुवर्षे होवूनही सिंधी बांधवांना गोंदिया जिल्ह्यात जागेचे कागदपत्रे मिळालेले नाहीत. सिंधी समाजाच्या ही जुनी मागणी त्वरित पूर्ण करण्यासाठी खा.मेंढे यांनी संबंधित विभागाला निर्देश दिलेत. याप्रसंगी नगराध्यक्ष अशोक इंगळे, उपविभागीय अधिकारी वंदना सवरंगपते, तहसीलदार राजेश भांडारकर,तहसीलदार खडतकर, रेल्वे अभियंता शर्मा, रेल्वे अभियंता राव , नगर परिषद कार्यकारी अधिकारी चंदन पाटील , भूमिअभिलेख अधिकारी पवार,फळड,तावाडे, संजय कुलकर्णी, बंटी गावंडे, अशोक जयसिंघानिया आदी उपस्थित होते.