29.8 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ ऑनलाईन तक्रार स्विकारण्याची सुविधा सुरू करा- डॉ. फुके

ऑनलाईन तक्रार स्विकारण्याची सुविधा सुरू करा- डॉ. फुके

धान खरेदी केंद्रावर शेतक-यांना येत असलेल्या अडचणीचे निराकरण करा

0
150

गोंदिया,दि.19:- जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात धानाचे उत्पादन झाले आहे. सध्याच्या घडीला पावसाळा सुरू होण्यापुर्वी शेतकऱ्यांनी आपले धान, धान खरेदी केंद्रावर आणुन लवकरात लवकर मोजणी व्हावी या साठी केंद्र संचालक यांच्या कडे मागणी करीत आहे. कि धान खरेदी केंद्रावर हमालांना धान उतर विण्यासाठी हमाली दर शासनाकडुन निश्चित केले असुन प्रतिक्विंटल १५ रूपये घेण्याचे आदेश आहे मात्र असे असतांना हि धान खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांकडून ३० रू प्रतिक्विंटल हमाली घेत असल्याचे शेतकऱ्यां कडून अशी तक्रार केली जात आहे त्याच प्रमाणे जे शेतकरी अशी तक्रार करीत आहेत अश्या शेतकऱ्यांचे धान हेतुपुरस्पर उशीरा मोजले जाते अशी तक्रार जिल्ह्यातील अनेक धान केंद्रावर धान आणणा-या शेतक-यांनी केलेली आहे. मात्र प्रत्यक्षात कर्मचा-यां अभावी धान खरेदी केंद्रावर जावुन तक्रारीचे निराकरण करता येत नसल्यामुळे स्वता शेतक-यांची तक्रार ऑनलाईन पद्धतीने घेण्याबाबतची सुविधा सुरू करण्यात यावी जेणे करून शेतक-यांची होणारी लुटवर होणार नाही व त्या वर नियंत्रण ठेवता येईल. अशी मागणी माजी पालकमंत्री तथा आमदार डॉ. परिणय फुके यांनी प्रसाशनाला केली आहे.