31.3 C
Gondiā
Sunday, August 2, 2026
Home विदर्भ 13 कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी परतले

13 कोरोनाबधित रुग्ण बरे होऊन घरी परतले

71 व्यक्तींची कोरोनावर यशस्वी मात आता उरले केवळ 09 रुग्ण 63 अहवालाची प्रतिक्षा

0
599

भंडारा दि. 30 (जिमाका) जिल्ह्यात आज 13 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत 71 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली असून जिल्ह्यात आता केवळ 9 रुग्ण कोरोनाचा उपचार घेत आहेत. जिल्ह्यात कोरोनाबधितांची संख्या 80 एव्हढी आहे.

आज बऱ्या झालेल्या 13 रुग्णांसह जिल्ह्यात आतापर्यंत 71 व्यक्तींनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. जिल्ह्यात आता केवळ 9 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण उपचार घेत आहेत. आतापर्यंतच्या कोरोनाबाधितांची संख्या 80 एव्हढी आहे. 63 अहवालाची प्रतिक्षा आहे.

आतापर्यंत 4196 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने नागपूर येथील प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत 80 व्यक्तींचा अहवाल पॉझिटिव्ह तर 4053 व्यक्तींचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. 63 नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे.
आज 30 जून रोजी आयसोलेशन वार्ड मध्ये 18 व्यक्ती भरती असून आतापर्यंत 470 व्यक्तींना आयसोलेशन वार्ड मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर कोविड केअर सेंटर साकोली, तुमसर, लाखांदूर, पवनी, लाखनी, भंडारा व मोहाडी येथे 216 भरती आहेत. 3428 व्यक्तींना रुग्णालय क्वारंटाईन मधून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
पुणे, मुंबई व इतर राज्यातून 44051 व्यक्ती भंडारा जिल्ह्यात आले असून 40214 व्यक्तींचा 28 दिवसांचा होम क्वारंटाईन कालावधी पूर्ण झाला आहे. तसेच अन्य ठिकाणाहून आलेल्या 3837 व्यक्तींना होम क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांनी घरामध्येच रहावे, घराबाहेर पडू नये अशा सक्त सूचना प्रशासनाने दिल्या आहेत.