34.8 C
Gondiā
Monday, June 8, 2026
Home विदर्भ जिल्ह्यात नवे 44 रुग्ण,बाधितांची संख्या 1103

जिल्ह्यात नवे 44 रुग्ण,बाधितांची संख्या 1103

0
1283

blank

गोंदिया,दि.25ः- जिल्ह्यात आज प्राप्त झालेल्या अहवालात 44 नवे कोरोना बाधित रुग्ण आढळल्याचे निदान झाले.त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधित रूग्णांची संख्या आता 1103 झाली आहे.उपचार घेत असलेल्या 10 रुग्णांनी आज कोरोनावर मात केल्याने त्यांना सुट्टी देण्यात आली आहे.गोंदियाच्या विषाणू प्रयोगशाळा चाचणीतून 849 नमुने आणि रॅपिड अँटिजेन चाचणीतून 261 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहे असे एकूण 1100 नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

आज जे 44 रुग्ण कोरोना बाधित आढळून आले आहे.यात सर्वाधिक 32 रुग्ण हे गोंदिया तालुक्यातील आहे.यामध्ये गोंदिया शहरातील रामनगर-5, लक्ष्मीबाई वार्ड-1, शास्त्री वार्ड -7,गोरेलाल चौक-4, बाराखोली-1, गोविंदपूर-1,शंकर चौक सिंधी कॉलोनी-1,अंबाटोली-1, गणेशनगर-2, माताटोली-2,छोटा गोंदिया-1,सेल्स टॅक्स कॉलोनी-1, गोंदिया तालुक्यातील कुडवा-1, कटंगी-3 आणि अंबोरा/रावणवाडी येथील एका रुग्णाचा समावेश आहे.

तिरोडा तालुक्यातील बेलाटी/खुर्द येथील एक रुग्ण,आमगाव शहरातील व बनगाव येथील प्रत्येकी एक रुग्ण ,सडक/अर्जुनी येथील एक रुग्ण,देवरी येथील एक रुग्ण,अर्जुनी/मोरगाव तालुक्यातील नवेगावबांध व केशोरी येथील प्रत्येकी एक रुग्ण आणि बाहेर जिल्ह्यातील व राज्यातील पाच रुग्ण असून यामध्ये भंडारा येथील एक रुग्ण आहे.एक रुग्ण हा छत्तीसगड राज्यातील रायपूर येथील,दोन रुग्ण हे शेजारच्या मध्यप्रदेश राज्यातील बालाघाट येथील व एक रुग्ण बय्यर येथील आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण बाधितांची संख्या 1103 झाली आहे.

जिल्ह्यातील कोरोना संसर्ग झालेले रूग्ण 1103 आहे.बाधित आढळलेले रुग्ण तालुकानिहाय पुढीलप्रमाणे. गोंदिया तालुका -465,तिरोडा तालुका-270, गोरेगाव तालुका -35, आमगाव तालुका -79, सालेकसा तालुका-41, देवरी तालुका -43,सडक/अर्जुनी तालुका -61,अर्जुनी /मोरगाव तालुका – 84 आणि बाहेर जिल्हा व राज्यात आढळलेले -15 रुग्ण आहे.

कोरोनावर मात करून आतापर्यंत 767 रुग्ण घरी गेले आहे.यामध्ये गोंदिया तालुका- 274,तिरोडा तालुका -236, गोरेगाव तालुका -25, आमगाव तालुका -52,सालेकसा तालुका -35, देवरी तालुका-40, सडक/अर्जुनी तालुका – 44, अर्जुनी/मोरगाव तालुका -57 आणि इतर -4 रुग्णांचा समावेश आहे.

कोरोना क्रियाशील रुग्ण 322 आहे. तालुकानिहाय पुढीलप्रमाणे आहे. गोंदिया तालुका- 194, तिरोडा तालुका-28, गोरेगाव तालुका -10, आमगाव तालुका -27, सालेकसा तालुका -6, देवरी तालुका -3, सडक/अर्जुनी तालुका -16, अर्जुनी/मोरगाव तालुका -27 आणि इतर – 11 असे एकूण 322 रुग्ण कोरोना क्रियाशील आहेत.त्यापैकी 315 क्रियाशील रुग्ण जिल्ह्यात व 7 रुग्ण नागपूर येथे उपचार घेत आहे.

गोंदियाच्या विषाणू प्रयोगशाळा चाचणीतून 849 नमुने तर रॅपिड ॲन्टीजन चाचणीतून 261असे एकूण 1100 नमुने पॉझिटिव्ह आढळले आहे.बाधित रूग्णांची संख्या 1103 झाली आहे. यामध्ये काही रुग्णांचे नमुने पुन्हा घेण्यात आल्यामुळे पॉझिटिव्ह नमुन्यांची संख्या जास्त आहे.

कोरोनावर ज्या रूग्णांनी मात केली आहे अशा रुग्णांची संख्या 10 आहे. यामध्ये गोंदिया तालुका -3, आमगाव तालुका-1,गोरेगाव तालुका -7 असे एकूण 767 रूग्ण आजपर्यत कोरोनातून बरे झाले आहे.

विषाणू चाचणी प्रयोगशाळेत तपासणीसाठी एकूण 14606 नमुने पाठविण्यात आले. यामध्ये 13127 नमुने निगेटिव्ह आले.तर 849 नमुने पॉझिटिव्ह आले आहे.207 नमुन्यांच्या अहवाल प्रलंबित असून 423 नमुन्यांच्या अहवाल अनिश्चित आहे.
विविध संस्थात्मक विलगिकरण कक्षात 57 व्यक्ती आणि गृह विलगिकरणात 917 व्यक्ती अशा एकूण 974 व्यक्ती विलगिकरणात आहेत.
बाधित रुग्णांचा तात्काळ शोध रॅपिड अँटीजेन टेस्टच्या माध्यमातून घेण्यात येत आहे. जिल्ह्यात 8971 व्यक्तींचे नमुने घेण्यात आले.यामध्ये 8710 व्यक्तींचे अहवाल निगेटिव्ह आले.261 व्यक्तींचे अहवाल पॉझिटिव्ह आढळून आले आहे.

blank