34.8 C
Gondiā
Thursday, May 15, 2025
Home Blog Page 5666

स्वच्छ नागपूर मोबाईल ॲपचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोर्कापण

0

 berartimes.com

नागपूर दि. 12 :-   स्वच्छ शहर, सुंदर शहर ही संकल्पना साकार करत

असताना प्रत्येक नागरिकांच्या योगदानाची आवश्यकता असून शहरातील
नागरिकांच्या तक्रारीसाठी महानगरपालिकेतर्फे मोबाईल ॲप तयार करण्यात आला
असून मोबाईल ॲपचे लोर्कापण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
झाले.

            दीक्षाभूमी येथील सभागृहात स्वच्छ नागपूर या गुगल प्लेस
स्टोअरवरील मोबाईल ॲपचे लोर्कापण समारंभास पालकमंत्री चंद्रशेखर
बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महापौर प्रवीण दटके,
मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय,  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण
परदेशी,  विभागीय आयुक्त अनूप कुमार, महानगर पालिका आयुक्त श्रावण
हर्डीकर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

स्वच्छ नागपूर हे मोबाईल ॲप व ऑनलाईन ट्रॅकींग शहरातील पाच लाख घरापर्यंत
पोहचविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात लक्ष्मीनगर झोन परिसरातील 50
हजार घरापर्यंत ही सेवा उपलब्ध होणार आहे. स्वच्छ नागपूरमध्ये सहभागी
होण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर स्वच्छ नागपूर ॲप शोधून इस्टांल करणे
आवश्यक आहे. आपण नोंदविलेल्या तक्रारीवर होणाऱ्या कार्यवाहीचा तपशील
तक्रार कर्त्याला या ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन बघता येणार आहे. या
प्रकारची पारदर्शी घनकचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया राबविणारी पहिली
महानगरपालिका असून संपूर्ण नागपुरात ही सेवा लवकरच उपलब्ध करुन देण्यात
येणार असल्याची माहिती महापौर प्रवीण दटके यांनी यावेळी दिली.

प्रारंभी महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्वागत करत
प्रास्ताविकात स्वच्छ नागपूर मोबाईल ॲप बद्दल माहिती दिली.

विदर्भातील पहिल्‍या टेक्‍सटाईल पार्कचे भूमिपूजन

0

टेक्‍सटाईल पार्कमुळे कृषी क्षेत्रात बदल घडू शकतो – मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस

berartimes.com
वर्धा, दि.11 – टेक्‍सटाईल पार्कच्‍या माध्‍यमातून शेतकरी आणि उद्योगाच्‍या सहकार्याने कृषी क्षेत्रात बदल घडू शकतेा. शेतीपूरक उद्योग आणि मुल्‍यवर्धित प्रकल्‍पाच्‍या माध्‍यमातून मोठया प्रमाणात शेतक-यांपर्यंत पैसा पोहोचवून त्‍यांच्‍या जीवनात आमुलाग्र बदल घडवण्‍यासाठी शासनाने इंटिग्रेटेड टेक्‍सटाईल पार्क योजना सुरु केली .यामुळे मध्‍यस्‍थांची साखळी दूर होऊन शेतकऱ्यांच्‍या कापसाला चांगला भाव मिळेल असे प्रतिपादन राज्‍याचे मुख्‍यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंगणघाट येथे विदर्भातील पहिल्‍या इंटिग्रेटेड टेक्‍सटाईल पार्कच्‍या भूमिपूजन  प्रसंगी केले.

            हिंगणघाट जवळ वणी येथे असलेल्‍या गिमाटेक्‍स इंडस्टि्रज प्रायव्‍हेट लिमिटेड यांच्‍या हिंगणघाट इंटिग्रेटेड टेक्‍सटाईल पार्कचे भू‍मीपूजन आणि नविन विस्‍तारित स्पिनींग युनीट चे उद्घाटन मुख्‍यमंत्र्यांचे हस्‍ते करण्‍यात आले. यावेळी उपस्थितांना संबोधित करतांना ते बोलत  होते. या कार्यक्रमाला राज्‍याचे वित्‍त व नियोजन मंत्री तथा जिल्‍हयाचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तडस, आमदार समिर कुणावार, डॉ. पंकज भोयर, गिमाटेक्‍स कंपनीचे अध्‍यक्ष
वसंतकुमार मोहता, व्‍यवस्‍थापकीय संचालक प्रशांतकुमार मोहता, अनुरागकुमारमोहता, जिल्‍हाधिकारी शैलेश नवाल, जिल्‍हा पोलिस अधिक्षक अंकित गोयल,भाजपचे जिल्‍हा‍ध्‍यक्ष राजेश बकाने उपस्थित होते.

             आज महाराष्‍ट्र हे कापूस  उत्‍पादक राज्‍य म्‍हणुन ओळखले जाते. राज्‍यात निर्माण होणा-या कापसापैकी 25 टक्‍के कापसावर प्रक्रिया होते, उर्वरित 75 टक्‍के कापसावर पूरक उद्योगाच्‍या साखळी अभावी आपण प्रक्रिया करु शकत नाही. यासाठी   इंटिग्रेटेड टेक्‍सटाईल पार्क ही योजना शासनाने  सुरु केली असून त्‍यातील पहिला पार्क विदर्भातील हिंगणघाट येथे सुरु होत असल्‍याबाबत त्‍यांनी मोहता कुंटूबियाचे अभिनंदन केले. यापुढे उद्योजक शेतक-यांकडून थेट कापूस खरेदी करतील. त्‍यामुळे शेतक-यांच्‍या कापसाला चांगला भाव मिळेल. यामध्‍ये कुणाचीही मध्‍यस्‍थी नसल्‍यामुळे थेट शेतक-याला कापसाची परिपूर्ती मिळेल. उद्योग आणि शेतक-यामध्‍ये सहकार्य असेल तर नव-नवीन तंत्रज्ञान शेतक-यापर्यंत पोहचवता येईल. कापसाची उत्‍पादकता वाढविण्‍यासाठी सुध्‍दा उद्योगाने संशोधन करुन ते शेतक-यांपर्यंत पोहचविले पाहिजे असेही मुख्‍यमंत्री यांनी यावेळी म्‍हणाले.

            यावेळी बोलतांना पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार म्‍हणाले,शेतक-याच्‍या जीवनात बदल घडविण्‍यासाठी शासन फार्म टू फॅशन ही संकल्‍पना रा‍बवित आहे. त्‍याचा प्रत्‍यय इंटिग्रेटेड टेक्‍सटाईल पार्क च्‍या माध्‍यमातून आज येत आहे. हिंगणघाट सारख्‍या छोटया शहरात मोहता कुंटूंबियाच्‍या सहा पिढयांपासून कापड प्रक्रिया उद्योग सुरु आहे.यामध्‍ये इंटिग्रेटेड टेक्‍सटाईल पार्कमुळे नविन तंत्रज्ञानाच्‍या माध्‍यमातून उच्‍च गुणतत्‍तेच्‍या कापडाची निर्मिती होईल, असा विश्‍वास त्‍यांनी यावेळी व्‍यक्‍त केला.  यावेळी वसंतकुमार मोहता यांनी गिमाटेक्‍स इंडस्‍ट्रीबाबत माहिती दिली. तर अनुरागकुमार मोहता यांनी इंटिग्रेटेड टेक्‍सटाईल पार्कबाबत प्रस्‍तावना केली. यावेळी गिमाटेक्‍स इंडस्‍ट्रीच्‍या वतीने तयार करण्‍यात आलेल्‍या जी फोर्स या अॅपचे लोकार्पण  करण्‍यात आले.यावेळी  कार्यक्रमाला उद्योजक, नागरिक मोठया संख्‍येने उपस्थित होते.

जलयुक्त शिवार अभियानासाठी मुख्यमंत्रीकडे ५० हजाराचा धनादेश सुपूर्द

0

berartimes.com नागपूर दि. १2 :- महाराष्ट्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणाऱ्या ‘जलयुक्त शिवारङ्क या महत्त्वाकांक्षी अभियानाचा चांगला परिमाण आज सर्वत्र दिसून येत आहे. या अभियानाने प्रेरित होऊन सेन्ट्रल एक्साईज कार्यालयाचे अधिक्षक रमेश थोटे यांनी रामगिरी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जलयुक्त शिवार योजनेसाठी त्यांच्या वतीने ५० हजार रूपयांचा धनादेश सुपूर्द केला.

रमेश थोटे यांनी सातव्या वेतन आयोगाच्या थकबाकीतून प्राप्त झालेली संपूर्ण रक्कम जलयुक्त शिवार योजनेसाठी दिली. जलयुक्त शिवार या अभिनव उपक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे समाजाच्या सर्व स्तरावरून अभिनंदन करण्यात येत आहे. अधिक्षक रमेश थोटे यांच्यापासून समाजबांधवांनी प्रेरणा घ्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले .

झारखंडमध्ये माओवाद्यांचा नेता चकमकीत ठार

0
वृत्तसंस्था
रांची – झारखंडमधील गुमला जिल्ह्यात केंद्रीय राखीव पोलिस दल आणि माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत माओवाद्यांचा नेता आशिष यादव ठार झाला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुमला जिल्ह्यातील पालकोट जंगलक्षेत्रात रविवारी दुपारी ही चकमक झाली. या चकमकीत माओवाद्यांचा नेता म्हणून प्रसिद्ध असलेल्या आशिष यादवला ठार मारण्यात यश आले आहे. त्याच्याकडून मोठ्याप्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
 
केंद्रीय राखीव पोलिस दल आणि पोलिसांनी संयुक्तरित्या मोहिम राबवत ही कारवाई केली. माओवाद्यांच्या बिहार-झारखंड विशेष भाग समितीचा तो नेता होता. आशिष यादववर सरकारकडून 25 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते.

न्यूझीलंडविरोधी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर, रहाणे उपकप्तान

0
मुंबई, दि. १२ – न्यूझीलंडविरुद्ध भारतात खेळल्या जाणा-या कसोटी मालिकेसाठी यजमान भारतीय संघ जाहीर झाला असून रोहित शर्मा व चेतेश्वर पुजाराला आणखी एक संधी देण्यात आली आहे. संदीप पाटील यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय निवड समितीने सोमवारी संघाची घोषणा केली. येत्या २२ सप्टेंबरपासून ही कसोटी मालिका सुरू होणार आहे.
कसोटी सामन्यातील रोहितच्या निराशाजनक कामगिरीनंतरही कर्णधार विराट कोहलीने त्याच्यावर विश्वास दाखवला असून  वन-डे स्पेशालिस्ट रोहितला कसोटी क्रिकेटमध्ये अधिक संधी मिळायला हवी असे मत त्याने मत मांडले होते. आघाडीच्या फळीतील अन्य एक फलंदाज चेतेश्वर पुजारावर नेहमी टांगती तलवार असते, मात्र न्युझीलंडविरोधात घरच्या मैदानावर होणा-या या मालिकेत त्याचा समावेश करण्यात आला आहे.
भारतीय संघ:  विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), के.एल. राहुल, चेतेश्वर पुजारा, मुरली विजय, रोहित शर्मा, आर.अश्विन, वृद्धीमान सहा, रवींद्र जडेजा, शमी, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, शिखर धवन, अमित मिश्रा, उमेश यादव.

स्वबळावर लढण्यासाठी कामाला लागा !-प्रफुल्ल पटेल

0

अकोला : काँग्रेस पक्षाचा आतापयर्ंत कटू अनुभव लक्षात घेता आगामी स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी कार्यकर्त्यानी आतापासूनच स्वबळावर कामाला लागावे, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खा. प्रफुल्ल पटेल यांनी रविवारी येथे केले. राष्ट्रवादी पक्षाचे जेवढे नुकसान काँग्रेसने केले, तेवढे कोणीही केले नाही. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राष्ट्रवादीची बदनामी करण्याची कोणतीच कसर सोडली नाही. ‘खुद तो डुबे सनम, हमको भी ले डुबे’ अशा पद्धतीची काँग्रेसची राकाँसोबत खेळी राहीली, असे टीकास्त्र प्रफुल्ल पटेल यांनी काँग्रेसवर सोडले.
महेश भवनात खा. प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचा जिल्हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. खा. पटेल म्हणाले की, काँग्रेसशिवाय दलित आणि अल्पसंख्याकांना दुसरा पर्याय नाही असा या पक्षाचा गैरसमज आहे. परंतु प्रत्यक्षात मात्र तसे नाही. अल्पसंख्याकाच्या प्रश्नावर राष्ट्रवादीने वेळप्रसंगी संघर्षही केला आहे. ही बाब सलत असल्यामुळे काँग्रेसने राष्ट्रवादीचे नेहमीच पाय ओढले आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर असून कार्यकर्त्यांनी आतापासूनच 8कामाला लागावे.

युनिव्हर्सल कंपनी सुरु होणार -पटले

0

तुमसर : विद्युत दर कमी केल्याचे आदेश न मिळाल्याने युनिव्हर्सल फेरो ही कंपनी अजूनही सुरु झालेली नाही. याबाबत कंपनीला आदेश मिळताच ही कंपनी सुरु होणार असल्याची माहिती शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पटले यांनी दिली आहे.
युनिव्हर्सल फेरो येथील आंदोलनानंतर राज्यशासनाने २६ टक्के विद्युत दर कमी केले आहे. पंरत अजूनपर्यंत राज्याचे राज्यपाल यांच्या वतीने शासकीय आदेशावर स्वाक्षरी होवून आदेश प्रसारित झालेले नाही. त्यामुळे कंपनी सुरु होण्यास उशिर होत आहे. या मुदय़ावर शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र पटले यांनी कंपनीचे मालक नेंत्रावाला यांच्या मुख्य अधिकार्‍यांसोबत सकारात्मक चर्चाकेली या चर्चेत ही कंपनी सुरु करण्याचा अडचणींवर सविस्तर चर्चाकरण्यात आली. कंपनीमार्फत उद्योगमंत्र्यांना दिलेल्या पत्राचा व त्यातील अटींचा उल्लेख करण्यात आला. मात्र त्यावर कंपनी प्रशासनाने गांभीर्य दाखविले नाही. या मुद्यावर शिवसेनेचे वेळोवेळी सहकार्य करण्याचे वचन दिल्यानंतरही याकडे लक्ष देण्यात येत नाही.
ना. सुभाष देसाई यांनी शासन स्तरावर आक्रमक भुमिका घेवून विदर्भ मराठवाड्यात २६ टक्के विद्युत दर प्रति युनिट मागे कमी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यासह अन्य विशेष सवलतीही देण्यात याव्या अशा निर्णय व त्यावर चर्चाकरण्यात आली होती. ७५ पैसे प्रति युनिट विद्युत बंद कारखाण्यासाठी मंजुर करवून घेतला. सध्या ७.४0 पैसे प्रति युनिट प्रमाणे दर कंपनीला लागू आहे. पंरतु २६ टक्के दर कमी झाल्यामुळे ५.४८ पैसे प्रति युनिट दर झाले आहे. त्यातून पुन्हा बंद पडलेल्या कारखान्यांसाठी ७५ पैसे कमी करण्यात येत असल्याने प्रति युनिट दर ४.७३ पैसे राहणार आहे.

भंडारा जिल्हा विज्युक्टा जिल्हा कार्यकारिणीची सभा उत्साहात

0

भंडारा,(११ )—स्थानिक जे.एम.पटेल काॅलेज येथे आज सकाळी साडे अकराच्या सुमारास भंडारा जिल्हा विज्युक्टा जिल्हा कार्यकारिणीची सभा उत्साहात पार पडली.
सभेच्या अध्यक्षस्थानी  विज्युक्टाचे जिल्हा अध्यक्ष प्रा.मार्तंड गायधने हे होते. केंद्रीय कार्यकारिणी सहसचिव प्रा.डाॅ ज्ञाननेश्वर गौपाले हेही प्रमुख्याने उपस्थित  होते.
शिक्षण आणि शिक्षकांचे प्रश्न सतत संघर्षरत राहुन सोडवणारी लढाऊ संघटना म्हणुन गेली ३३वर्षापासुन कार्यरत असणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांच्या विज्युक्टा संघटनेचे राज्यस्तरीय महाअधिवेशन येत्या आॅक्टो-नोव्हेंबर मध्ये श्रीक्षेत्र शेगाव येथे आयोजित करण्यात येणार आहे.  त्यासंदर्भात नियोजन वआढावा घेण्यासाठी या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
संघटनेनी शिक्षणक्षेत्रातील अनेक समस्या सोडविल्या,आंदोलनाच्या माध्यमातून विविध शाशन आदेश काढुन घेतले. तरीही नवनवीन प्रश्नांसोबत काही महत्वाचे प्रश्न अजुनही प्रलंबित आहेत. दिवसागणिक निघणारे शासन आदेश हे शासनाची शिक्षण व शिक्षकांप्रती नकारात्मक भूमिका सिध्द करणारे आहेत. शिक्षणव्यवस्थेला उद्ध्वस्त करणारे हे धोरण हाणून पाडण्यासाठी तसेच शैक्षणिक हित जोपासण्यासाठी संघठित प्रयत्नांचा एक भाग म्हणून या अधिवेशनाची उत्स्फूर्त तयारी संघटनेच्या सभासदांनी चालवली आहे. या निमित्ताने संपूर्ण राज्यातील शिक्षकांची मांदियाळी श्रीक्षेत्र शेगाव येथे भरणार आहे. याविषयीची माहिती व जिल्ह्याचे नियोजन कसे असेल, यावर चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्हातील विवीध समस्यांवर एकत्रित चर्चा सुद्धा करण्यात आली
सभेचे संचालन जिल्हासचिव प्रा.राजेंद्र दोनाडकर यांनी केले. उपस्थितांचे आभार जिल्हा सहसचिव प्रा.एस आर सावरकर यांनी मानले.
यावेळी जिल्हा कार्यकारिणीचे पदाधिकारी प्रा.सावरकर,प्रा.मुदलियार,प्रा.चौधरी,प्रा.डी.लांजेवार,प्रा.पी के शिवणकर,प्रा.किरणापुरे,प्रा.सिंगनजुडे,प्रा.अशोक गायधने,प्रा.बन्सोड व तुमसर तालुका अध्यक्ष प्रा. डब्लु यु मोहतुरे,लाखनी ता.अध्यक्ष प्रा.उमेश सिंगनजुडे व सचिव प्रा.युवराज खोब्रागडे,प्रा ए ए पटले,भंडारा ता.अध्यक्ष प्रा.सुभाष गोंधुळे ,जि.का सदस्य प्रा.शिवशंकर कारेमोरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

नौगम सेक्टरमध्ये चकमकीत 4 दहशतवादी ठार

0
 वृत्तसंस्था

श्रीनगर – जम्मू काश्मीरमधील नौगम सेक्टरमध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवरून (एलओसी) भारतीय हद्दीत घुसखोरी करण्याचा दहशतवाद्यांचा कट उधळून लावत चार दहशतवाद्यांना ठार मारण्यात सुरक्षा रक्षकांना यश आले आहे.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, नौगम सेक्टरमध्ये एलओसीवर सीमेपलिकडून भारतीय हद्दीत घुसखोरी होत असल्याच्या संशय आल्याने गोळीबार करण्यात आला. यावेळी दहशतवाद्यांकडूनही गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला सुरक्षा रक्षकांनी चोख प्रत्युत्तर देत चार दहशतवाद्यांना ठार केले.या दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. परिसरात सुरक्षा रक्षकांकडून शोधमोहिम राबविण्यात येत आहे.