स्वच्छ नागपूर मोबाईल ॲपचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोर्कापण

0
7

 berartimes.com

नागपूर दि. 12 :-   स्वच्छ शहर, सुंदर शहर ही संकल्पना साकार करत

असताना प्रत्येक नागरिकांच्या योगदानाची आवश्यकता असून शहरातील
नागरिकांच्या तक्रारीसाठी महानगरपालिकेतर्फे मोबाईल ॲप तयार करण्यात आला
असून मोबाईल ॲपचे लोर्कापण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते
झाले.

            दीक्षाभूमी येथील सभागृहात स्वच्छ नागपूर या गुगल प्लेस
स्टोअरवरील मोबाईल ॲपचे लोर्कापण समारंभास पालकमंत्री चंद्रशेखर
बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, महापौर प्रवीण दटके,
मुख्य सचिव स्वाधिन क्षत्रिय,  मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रवीण
परदेशी,  विभागीय आयुक्त अनूप कुमार, महानगर पालिका आयुक्त श्रावण
हर्डीकर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

स्वच्छ नागपूर हे मोबाईल ॲप व ऑनलाईन ट्रॅकींग शहरातील पाच लाख घरापर्यंत
पोहचविण्यात येणार असून पहिल्या टप्प्यात लक्ष्मीनगर झोन परिसरातील 50
हजार घरापर्यंत ही सेवा उपलब्ध होणार आहे. स्वच्छ नागपूरमध्ये सहभागी
होण्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर स्वच्छ नागपूर ॲप शोधून इस्टांल करणे
आवश्यक आहे. आपण नोंदविलेल्या तक्रारीवर होणाऱ्या कार्यवाहीचा तपशील
तक्रार कर्त्याला या ॲपच्या माध्यमातून ऑनलाईन बघता येणार आहे. या
प्रकारची पारदर्शी घनकचरा व्यवस्थापनाची प्रक्रिया राबविणारी पहिली
महानगरपालिका असून संपूर्ण नागपुरात ही सेवा लवकरच उपलब्ध करुन देण्यात
येणार असल्याची माहिती महापौर प्रवीण दटके यांनी यावेळी दिली.

प्रारंभी महानगरपालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्वागत करत
प्रास्ताविकात स्वच्छ नागपूर मोबाईल ॲप बद्दल माहिती दिली.