23 C
Gondiā
Wednesday, July 22, 2026
Home महाराष्ट्र नागपूर,अमरावतीसह 10 शहराची स्मार्ट शहरासाठी निवड

नागपूर,अमरावतीसह 10 शहराची स्मार्ट शहरासाठी निवड

0
26

मुंबई, दि. ३१ – केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानात मुंबई, नवी मुंबई, ठाणे, कल्याण – डोंबिवलीसह राज्यातील १० शहरात निवड केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
शुक्रवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील स्मार्ट सिटीसंदर्भात विधीमंडळात निवेदन दिले. केंद्र सरकारच्या स्मार्ट सिटी अभियानाची राज्यात अंमलबजावणी करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्य उच्चाधिकार समितीची नेमण्यात आली होती. या समितीने नवी मुंबई, पुणे , पिंपरी – चिंचवड, नाशिक, ठाणे, मुंबई, अमरावती, सोलापूर, नागपूर, कल्याण – डोंबिवली, औरंगाबाद या दहा शहरांची निवड केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.