25.5 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home राष्ट्रीय देश रामसेवक शर्मा ट्रायचे नवे अध्यक्ष

रामसेवक शर्मा ट्रायचे नवे अध्यक्ष

0
18

वृत्तसंस्था
नवी दिल्ली, दि.१० -भारतीय दूरसंपर्क नियामक प्राधिकरण (ट्राय) च्या अध्यक्षपदाची सूत्रे रामसेवक शर्मा यांनी सोमवारी स्वीकारली.ग्राहकांना चांगली व अखंडित सेवा देण्यावर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. १४ मे रोजी राहुल खुल्लर सेवानिवृत्त झाल्यापासून हे पद रिक्त होते.
झारखंड कॅडरच्या १९७८ मधील आयएएस तुकडीचे असलेले शर्मा पुढे म्हणाले की, सोमवारीच आपण पदाची सूत्रे स्वीकारली असून प्राधिकरणाशी संबंधित सर्वच मुद्यांवर आपण आधी सहकारी सदस्यांशी चर्चा करू व नंतर योजावयाच्या आराखड्याला अंतिम रूप देणार आहोत.