25.5 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ किकरीपार येथे स्तनपान सप्ताह

किकरीपार येथे स्तनपान सप्ताह

0
24

आमगाव दि. ११:: किकरीपार येथील अंगणवाडी क्र.२ येथे स्तनपान सप्ताह सरपंच कविता मेंढे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.
अतिथी म्हणून शारदा मेंढे, आरोग्य सेविका शेंडे, बांभरे, मयुरी वैरागडे, आशा पर्यवेक्षीका मंगला मेंढे, लता रहिले, अंगणवाडी सेविका ज्योती हेमने, आशा सेविका प्रमीला बिसेन, मदतनिस जानकी मोटघरे उपस्थित होते. या वेळी 0 ते ६ वर्ष वयोगटातील बाळांना निव्वळ स्तनपान व सहा महिन्यापर्यंत वरच्या बाळाला पुरक आहार सुरू करणे तसेच गरोदर मातेने आहर कसा घ्यायचा या संदर्भात मार्गदर्शन करण्यात आले.
अतिसार नियंत्रण पंधरवाडा २७ जुलै ते ८ ऑगस्ट दरम्यान घेण्यात आला. ओआरएसचे द्रावण तयार करणे, हात धुण्याच्या पध्दतीचे प्रात्याक्षिक करून दाखविण्यात आले. या वेळी गावातील गरोदर माता, किशोर वयीन मुली, स्तनदा माता उपस्थित होत्या.