26.3 C
Gondiā
Thursday, July 30, 2026
Home विदर्भ रमाई घरकुलाचे ३३ लाभार्थ्यांना धनादेश वाटप

रमाई घरकुलाचे ३३ लाभार्थ्यांना धनादेश वाटप

0
26

गोंदिया दि. ११: दलित कुटुंबांसाठी रमाई घरकूल योजना राबविली जाते.यापासून काही लाभार्थी वंचित होते.त्यासाठी नगराध्यक्ष कशिश जायस्वाल व नगरसेवक घनश्याम पानतवने यांनी सतत पाठपुरावा केला. नगर परिषद गोंदियाच्या सभागृहात वंचित लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांची यादी नगर परिषदेने तीन वर्षांपूर्वीच शासनाला पाठविली होती. मात्र निधी उपलब्ध करून देण्यात आले नव्हते.नगर परिषदेच्या अनेकदा चकरा मारूनही दखल घेण्यात आली नव्हती. या गंभीर बाबीची दखल घेत नगराध्यक्ष जायस्वाल व नगरसेवक पानतवने यांनी जिल्हाधिकार्‍यांमार्फत शासनाकडे पाठपुरावा केला. त्यामुळे शासनाने रमाई घरकूल योजनेचा निधी जिल्ह्याला उपलब्ध करून दिला. समाजकल्याण उपायुक्त सुनील जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत नगराध्य जायस्वाल यांच्या हस्ते ३३ लाभार्थ्यांना धनादेश वाटप करण्यात आले. या वेळी मुख्याधिकारी वाघूरवाघ, शिव शर्मा, महेंद्र उके, अभय अग्रवाल, बांधकाम सभापती राकेश ठाकूर, उपाध्यक्ष हर्षपाल रंगारी, अभियंता भावे, नूतन कोरडे, सुनील मेश्राम आदी उपस्थित होते.