28.7 C
Gondiā
Saturday, August 1, 2026
Home Top News काश्मीरमध्ये मशिदीबाहेर स्फोट; 11 जखमी

काश्मीरमध्ये मशिदीबाहेर स्फोट; 11 जखमी

0
17

वृत्तसंस्था
गुरुवार, 13 ऑगस्ट
श्रीनगर – जम्मू काश्मीरमधील शोपियाँ जिल्ह्यात आज (गुरुवार) सकाळी मशिदीबाहेर झालेल्या ग्रेनेड स्फोटात 11 जण जखमी झाले आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोपियाँतील जामिया मशिदीत आज पहाटे नमाज पठण करून नागरिक मशिदीबाहेर आल्यानंतर हा स्फोट झाला. मशिदीबाहेर लावलेल्या कंटेनरमध्ये ग्रेनेड ठेवल्याचा अंदाज आहे. जखमींना स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, काही जणांचा प्रकृती गंभीर आहे.शोपियाँ जिल्ह्यात बुधवारी दुपारी ग्रेनेड स्फोट झाला होता. या स्फोटात एक जवान गंभीर जखमी झाला आहे