विद्यार्थ्यांनी भ्रष्टाचारमुक्त होण्याची प्रेरणा घ्यावी-मोदी

0
11

आमगाव दि. १३: जेसीआय आमगावद्वारे देशभक्तीपर गीत व नृत्य स्पर्धाचे बक्षीस वितरण कार्यक्रम पार पडले. यात अतिथी म्हणून पुरुषोत्तम मोदी यांनी मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी विद्यार्थिदशेपासूनच भ्रष्टाचारमुक्त होण्याची शपथ घ्यावी, असे विचार व्यक्त केले.
याप्रसंगी मंचावर पोलीस उपनिरीक्षक सचिन पवार, डॉ. नितेश वाजपायी, वसंत मेश्राम, प्रा. कमलबापू बहेकार, रवी अग्रवाल, रवी क्षीरसागर, संतोष पुंडकर व जयश्री पुंडकर उपस्थित होते.
विद्यानिकेतन हायस्कूल आमगाव, पंचशील हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय मक्काटोला, भवभूती महाविद्यालय आमगाव, आदर्श विद्यालय आमगाव, स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय आमगाव, विद्या निकेतन कॉन्व्हेंट आमगाव, जिल्हा परिषद हायस्कूल आमगाव, हरिहरभाई पटेल विद्यालय चिरचाळबांध, डॉ. श्रीकांत जिचकार मॉडेल कॉन्व्हेंट किंडगीपार येथील विद्यार्थ्यांनी समूह गीत नृत्य स्पर्धेत भाग घेतला होता.
यावेळी सचिन पवार म्हणाले की, पश्‍चिम महाराष्ट्रातसुद्धा स्वातंत्र्य संग्राम सेनानी होऊन गेलेत, पण त्यांची दखल अजूनपर्यंत कोणत्याही संघटनेने घेतली नाही. आमगाव जेसीआयला धन्यवाद देतो की, त्यांनी स्वातंत्र्य संग्राम सेनानींना स्मरण करुन त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली. यापुढेही जेसीआय आमगावने प्रत्येक सामाजिक संघटनेंतर्गत समाजहिताचे काम करावे, असे आवाहन त्यांनी केले.कार्यक्रमाचे संचालन कमलबापू बहेकार व आभार रवी क्षीरसागर यांनी मानले.कार्यक्रमासाठी संतोष पुंडकर, रवि दत्त, आयुष अग्रवाल, राजू वंज़ारी, शोभेलाल कटरे, प्राचार्य एच.बी. मेंढे, प्राचार्य जी.एम. येळे, प्राचार्य के.टी. धनोले, भोला गुप्ता, रितेश अग्रवाल, रवी क्षीरसागर, डॉ. टी.डी. कटरे, संतोष नागपुरे व जेसीआय आमगावच्या सभासदांनी सहकार्य केले.