
चामोर्शी=स्थानिक शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालयाची प्राची शंकर कोठारे या विद्यार्थींनीने नीट परीक्षेत संपूर्ण भारतातून १५६ वा तर ओबीसी प्रवर्गातून ३२ वा क्रमांक प्राप्त करून विदर्भात प्रथम येण्याचा मान मिळविला आहे. त्याबद्दल श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल म्हशाखेत्री यांच्या हस्ते प्राची कोठारे हिचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव गो.वि. बानबले, ज्येष्ठ सदस्य डी. एन. चापले, प्राचार्य हेमंत रामटेके, उप्रपाचार्य किरमे, उप्रपाचार्य ताराम, प्रा. गौरकर, प्रा. शेट्ये, प्रा. पंकज नरूले, प्रा. सौरभ म्हशाखेत्री, प्रवीण ब्राम्हणवाडे, शंकर कोठारे, सौ. कोठारे उपस्थित होते.
प्राचीने आपल्या यशाचे श्रेय शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय चामोर्शीचे प्राचार्य व शिक्षक आणि आई’वडीलांना दिले. प्राचीला शुभेच्छा देताना मंडळाचे अध्यक्ष अनिल म्हशाखेत्री म्हणाले, तू नामांकित डॉक्टर होऊन आपल्या जिल्ह्यात सेवा प्रदान करावी, असा आशावाद व्यक्त केले. संचालन रामकृष्ण ताजने तर आभार राजेंद्र हिवरकर यांनी मानले. तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.