मुंबई – देशाने कालच (शनिवार) 69 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा केला. ठिकठिकाणी झेंडावंदन झाले. सर्वत्र तिरंग्याचे रंग दिसत होते. काहींनी आपले चेहरे रंगवले होते तर काहींनी गाडीवर, घरामध्ये कागदी ध्वज लावून आपले राष्ट्रप्रेम व्यक्त केले. पण, या तिरंग्याविषयी असलेल्या काही रंजक गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. एक भारतीय म्हणून त्यांची माहिती असणे अत्यंत गरजेचे आहे.
शहिदाच्या मृतदेहवर असलेल्या राष्ट्रध्वजाचे काय होते ?
राष्ट्रनिर्मितीसाठी आणि देशाच्या प्रगतीसाठी ज्यांना अतुलनीय कार्य केले किंवा जे देशासाठी सीमेवर लढताना शहीद झाले, अशा व्यक्तींच्या मृतदेहावर राष्ट्रध्वज ठेवला जातो. पण, ज्या वेळी प्रत्यक्ष अंत्यसंस्काराची वेळ येते त्यावेळी मृतदेहाववरून सन्मानाने राष्ट्रध्वज काढला जातो. राष्ट्रध्वजाविना मृतदेह कब्रीमध्ये किंवा सरणावर ठेवला जातो. दरम्यान, ध्वजाची केसरी पट्टी मृतदेहाच्या डोक्याच्या बाजूने असणे आवश्यक आहे.
शहिदाच्या मृतदेहावरून राष्ट्रध्वज काढल्यानंतर अंत्यत सन्मानपूर्वक गोपनीयरीत्या त्याला अग्नीदिली जाते किंवा वाळू बांधून किंवा एखादी जड वस्तू बांधून सन्मानपूर्वक नदीत सोडले जाते. हेच एखादा राष्ट्रध्वज फाटलेला असेल तर त्याच्या बाबतीतही केले जाते. फाटलेला राष्ट्रध्वज फडकावणे म्हणजे राष्ट्रध्वजारा अवमान समजल्या जातो.
राष्ट्रउभारणीसाठी अतुलनीय कार्य करणा-या व्यक्तीचे निधन होते आणि देशात राष्ट्रीय दुखवटा घोषित केला जातो तेव्हा काही वेळासाठी राष्ट्रध्वज झुकवला जातो. पण, ज्या भवनामध्ये संबंधित व्यक्तीचा मृतदेह ठेवलेला आहे त्याच्या भवनावरील राष्ट्रध्वज झुकवल्या जातो. दरम्यान, अंत्यविधीसाठी मृतदेह बाहेर आणला की राष्ट्रध्वज सन्मानपूर्वक पूर्ववत केला जातो.
26 जानेवारी 2002 रोजी ध्वज संहितेमध्ये सुधारणा केली गेली. त्यानुसार, आता सामान्य नागरिक, खासगी कार्यालये, घरे, कॉलनी या ठिकाणी कुणालाही आणि कधीही (केवळ 15 ऑगस्ट, 26 जानेवारीच नाही) राष्ट्रध्वज फडकवण्याची मुभा देण्यात आलेली आहे. पण, असे करताना ध्वज संहितेचे पालन करणे नितांत आवश्यक आहे.
> पहिला ध्वज 7 ऑगस्ट 1906 रोजी पारसी बागान चौक (ग्रीन पार्क) कोलकत्तामध्ये फडकवला गेला. लाल, पिवळ्या आणि हिरव्या रंगाच्या पट्टयांनी तो बनवला गेला होता.
> राष्ट्रपती भवनाच्या संग्रालयात एक असा लहान तिरंगा आहे, ज्याला सोन्याच्या स्तंभावर हीरे-जवाहरात जोडून तयार केले गेले आहे.
> माउंट एवरेस्टवर पहिल्यांदा यूनियन जॅक आणि नेपाळी राष्ट्रीय ध्वजासह 1953 मध्ये आपला तिरंगा फडकवला गेला. जेव्हा शेरपा तेनजिंग आणि अडमण्ड हिलेरी यांनी माउंट एवरेस्टवर विजय प्राप्त केला होता.
21 एप्रिल1996 ला स्क्वाड्रन लीडर संजय थापर यांनी एम. आई.-8 हेलिकॉप्टर वरून 10000 फूट उंचावरून उडी मारून पहिल्यांदा उत्तरी ध्रुवावर तिरंगा फडकवला.





