23.7 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ सुर्याटोला हनुमान मंदिर परिसरात वृक्षारोपण

सुर्याटोला हनुमान मंदिर परिसरात वृक्षारोपण

0
22

गोंदिया,दि.२१ -स्थानिक सूर्याटोला प्रभागातील रेल्वेलाईन जवळ असलेल्या छोटा हनुमान मंदिर परिसरात नुकतेच सेवा सामाजिक संघटनेतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आले.
पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी सेवा सामाजिक संस्थेतर्फे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे. त्याच अनुषंगाने सामाजिक बांधीलकी म्हणून संस्थेमार्फत शहरात वृक्षारोपणाचे कार्य हाती घेण्यात आले. सूर्याटोला रेल्वेलाईन जवळ असलेल्या हनुमान मंदिराजवळ संस्थेमार्फत वडाचे झाड लावून वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी संस्थेच्या सविता तुरकर, मनिष तिवारी, गुलाब ठाकूर, रिना रहांगडाले, निलेश देशभ्रतार व सूर्याटोला परिसरातील गणमान्य नागरिक उपस्थित होते.

blank