38.6 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home Top News काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, मुख्यमंत्री काँग्रेस महापालिकांना निधी देत नाहीत

काँग्रेसचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा, मुख्यमंत्री काँग्रेस महापालिकांना निधी देत नाहीत

0
197

blank

परभणी=महाविकास आघाडीमध्ये काहीही आलबेल नसल्याचे वारंवार समोर येत असते. तिन्ही पक्षांमध्ये काहीच ताळमेळ नसल्याच्या चर्चा नेहमीच केल्या जात असतात. आज पुन्हा एकदा हा मुद्दा समोर आला आहे. काँग्रेसच्या महापालिकांना मुख्यमंत्री निधीत देत नसल्याचा गंभीर आरोप सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केला आहे. यानंतर पुन्हा एकदा महाविकास आघाडीतील वाद चव्हाट्यावर आला आहे.

अशोक चव्हाण याविषयी बोलताना म्हणाले की, ‘काँग्रेसची सत्ता असलेल्या महापालिकांना मुख्यमंत्र्यांकडून निधी दिला जात नाही. याच कारणामुळे नांदेडलाही निधी मिळालेला नाही. मात्र आपण सार्वजनिक बांधकाम खात्याकडून निधी मिळवून दिला’ असे वक्तव्य अशोक चव्हाणांनी केले आहे. अशोक चव्हाण हे परभणीतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. अतिवृष्टीमुळे मराठवाड्यात झालेल्या नुकसानीचा आढावा चव्हाणांनी घेतला.

अशोक चव्हाण पुढे बोलताना म्हणाले की, आपण सत्तेत असतो तेव्हा आपल्या भागाचा विकास व्हायला हवा या मताचा मी आहे. मात्र दुर्देवाने कोरोनामुळे 30 टक्केच निधी मिळाला. मात्र मराठवाड्यात जास्तीत जास्त निधी देण्याची माझी भूमिका असल्याचेही अशोक चव्हाण म्हणाले. यासोबतच चव्हाणांनी शिवसेनेसोबत आघाडी करण्याविषयीही भाष्य केले आहे. ते म्हणाले की, ‘विधानसभा निवडणुकीनंतर दिल्लीतील काँग्रेस नेते शिवसेनेसोबत युती करण्यास अनुकूल नव्हते. मात्र राज्यातील काँग्रेस नेत्यांच्या आग्रहामुळे महाविकासआघाडी प्रत्यक्षात आली असल्याचा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.