41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home यशोगाथा जैविक इंधन व खताचा प्रकल्प लवकरच गोंदियात; शेतकरीच पिकविणार जैव इंधन

जैविक इंधन व खताचा प्रकल्प लवकरच गोंदियात; शेतकरीच पिकविणार जैव इंधन

0
113

blank

गोंदिया : पेट्रोल- डिझेल आणि गॅस यांच्या किंमतीत सातत्याने वाढ होत आहे़ तसेच पर्यावरणाच्या दृष्टीकोनातूनही हे पदार्थ हानीकारक आहेत. तेव्हा याला पर्याय म्हणून गोंदिया तालुक्यातील रायपूर येथे २५ एकर जागेवर जैव प्रक्रिया करून जैव इंधन व जैविक खतांचा निर्मिती प्रकल्प सुरू होणार असल्याची माहिती प्रकल्पाचे संचालक महेंद्र ठाकूर यांनी दिली असून या प्रकल्पाचे भुमिपूजन अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर १४ मे रोजी ऑनलाईन पध्दतीच्या माध्यमातून होणार आहे.
दोन दशकांपासून अग्रीकल्चर बायोटेव्नâालॉजी क्षेत्रात काम करणारी रूची बायोकेमिकल्सने मुंबईच्या नामवंत मिरा क्लिनफ्युल कंपनीच्या तांत्रिक व आर्थिक सहाय्याने हा प्रकल्प सुरू करण्याचा संकल्प घेतला आहे. भुमिपूजन प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामविकास प्रभागाच्या अध्यक्ष राजयोगिनी ब्रम्हकुमारी सरला दिदि राहणार आहेत. गोंदिया तालुक्यातील प्रत्येक गावात गवताची लागवड केली जाईल, या व्यतिरिक्त गाव व शहरातील ओला कचरा, पाला पाचोळा, जैव इंधन व खताच्या निर्मिती वापरण्यात येईल. या प्रकल्पाचे पेटंट जर्मन टेव्नâालॉजीच्या सहाय्याने बायोरिएक्टरमध्ये गॅस निर्मिती होणार. ही गॅस शुध्दीकरणानंतर मोटारबाईक, कार, मालवाहक, ट्रॅक्टर, वाहन चालविण्यासाठी वापरण्यात येईल. तसेच घरगुती गॅस व औद्योगिक क्षेत्रासाठीही वापरण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, उत्पादन प्रक्रियेत कुठल्याही प्रकारचे प्रदूषण नाही. व वापरल्यावर पेट्रोल, डिझेलच्या तुलनेत ५० टक्केपेक्षा जास्त प्रदूषण कमी होणार आहे. तेव्हा सर्व शेतकर्‍यांनी या मोहिमेत सहभागी होवून तालुका व जिल्ह्याला समृध्द तसेच प्रदूषणमुक्त करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन संचालक महेंद्र ठाकूर यांनी केले आहे.
………….
सभासदांच्या माध्यमातून शेतकरी उत्पादक
या प्रकल्पाला गवत पुरविण्याचे काम शेतकरी करणार असून शेतकरी उत्पादक कंपनी गठीत करण्यात आली आहे. गोंदिया पावर प्रोड्यूसर कंपनीच्या माध्यमातून शेतकर्‍यांना सभासद होण्याची संधी देण्यात आली आहे. तेव्हा या नाविण्यपूर्ण प्रकल्पाचे जास्तीत जास्त शेतकर्‍यांनी सभासद व्हावे व होणार्‍या आर्थिक प्रगतीचे भागीदार व्हावे, असे आवाहन महेंद्र ठाकूर यांनी केले आहे.
…….
रोजगार निर्मिती व उत्पादनावर भर
सध्या परिस्थितीत धान शेती शासकीय यंत्रणेवर अवलंबून आहे. तेव्हा या यंत्रणेवर अवलंबून न राहता कमीत कमी एकरी ५० हजार रूपयाचे उत्पन्न शेतकर्‍यांना मिळेल, अशी व्यवस्था या माध्यमातून करण्यात येईल. प्रत्येक ग्राम पंचायतमध्ये एक छोटे प्रोसोसिंग युनिट उभारण्यात येईल. ज्यामुळे गाव पातळीवर रोजगार निर्मिती व उत्पन्नाचे साधन तयार होईल. सर्व नोंदणीकृत सदस्यांनी शेतात गवत लावण्यासाठी बियाणे नि:शुल्क देण्यात येईल. तसेच जैविक शेतीसाठी प्रकल्पातून तयार होणार खत स्वस्त दरात शेतकर्‍यांना उपलब्ध करून देण्यात येईल.
००००००

blank