41.3 C
Gondiā
Friday, June 5, 2026
Home विदर्भ 13 आँगस्टपासून जि.प.मध्ये गैरहजर सीईओ रजेवर की सेवेत

13 आँगस्टपासून जि.प.मध्ये गैरहजर सीईओ रजेवर की सेवेत

0
355

blank

गोंदिया,दि.26ः- जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिपकुमार डांगे हे गेल्या 13 आँगस्टपासून जिल्हा परिषदेत आलेच नसल्याची माहिती समोर आली आहे.13 आँगस्टला ते विभागीय आयुक्त कार्यालयात असलेल्या आढावा बैठकीला सुध्दा गैरहजर होते.तर 14 आँगस्टरोजी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत झालेल्या डीपीडीसी बैठकीलाही गैरहजर होते.तेव्हापासून आजपर्यंत जिल्हापरिषदेत आलेले नाहीत.13 आँगस्टदरम्यान ते आजारी राहिल्याने नागपूरातील सीम्स रुग्णालयात उपचार घेतल्याचे सांगितले गेले.मात्र त्यांनी वैद्यकीय किंवा साधी रजा सुध्दा विभागीय आयुक्त कार्यालयातून घेतली नसल्याची माहीती विभागीय आयुक्त कार्यालयातून देण्यात आली.वरिष्ठ अधिकारीच जिल्हा परिषदेत गैरहजर असल्याने व ते रजेवर आहेत की कार्यरत याबद्दल कुणीही अधिकारी स्पष्टपणे सांगायला तयार नाही.तर कुणी महाज्योती या संस्थेचा प्रभार असल्याने त्याठिकाणी हजर असतील असेही सांगितले जात असताना नेमके मात्र ते कुठल्या ठिकाणी कार्यरत आहेत हे कळेनासे झाले आहे.त्यातच त्यांच्या गैरहजेरीमुळे ग्रामसेवक संघटनेने सुरु केलेल्या आंदोलनावरही कुणी निर्णय घ्यायला समोर न आल्याने चांगलीच कोंडी निर्माण झाली आहे.

blank