गोंदिया 0,बुलडाणा 2,भंडारा 3,वाशिम 1,गडचिरोली 4 कोरोना बाधित

0
48

गोंदिया,दि.26 : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया येथील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेतून आज 26 ऑगस्ट रोजी प्राप्त अहवालात जिल्ह्यात नविन एकही कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आला नाही. आज डिस्चार्ज रुग्णाची संख्या 0 आहे.
आजपर्यंत 41,199 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे. 40,494 रुग्णांनी आतापर्यंत कोरोनावर मात केली आहे. क्रियाशील असलेल्या जिल्ह्यातील बाधित रुग्णांची संख्या 2 आहे. 2 क्रियाशील असलेला बाधित रुग्ण घरीच अलगीकरणात आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 576 रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्ण आजारातून बरे होण्याचे प्रमाण 99.27 टक्के आहे. बाधित रुग्णांचा मृत्यू दर 1.40 टक्के आहे तर डब्लिंग रेट 674.6 दिवस आहे.
गोंदियाच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विषाणू संशोधन व निदान प्रयोगशाळेत कोरोना विषाणूच्या तपासणीसाठी आतापर्यंत 445334 नमूने पाठविण्यात आले. यामध्ये RT-PCR चे 226369 नमूने असून रॅपिड अँटीजेन चाचणी (RAT) चे 218965 नमूने आहेत. कोरोना वॉर रूममधून बाधित रुग्णांसाठी 24 तास सेवा उपलब्ध आहे. ज्या रूग्णांना काही समस्या असल्यास त्यांनी 8308816666 आणि 8308826666 या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा.

बुलडाणा-आज पॉझिटिव्ह:2,एकूण पॉझिटिव्ह : 87382,मृत्यू : 672,आतापर्यंत डिस्चार्ज :86686,आजचे डिस्चार्ज : 2

जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या तीन

भंडारा, दि.26:- जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण संख्या तीन निघाली असून आज बरे झालेल्या रुग्णांची संख्या एक आहे. आज 500 व्यक्तींची चाचणी केली असता तीन व्यक्ती पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. जिल्ह्याचा आजचा पॉझिटिव्हीटी रेट 0.6 टक्के आहे. जिल्ह्यात आता 08 सक्रिय रुग्ण आहेत.आज 01 रुग्ण बरा होऊन घरी गेला असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या 58942 झाली आहे. आज तीन व्यक्ती कोरोना बाधित आढळून आल्या. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 60083 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्के आहे. आतापर्यंत 04 लाख 47 हजार 309 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 60083 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 03, मोहाडी 00, तुमसर 00, पवनी 00, लाखनी 00, साकोली 00 व लाखांदुर तालुक्यातील 00 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 58942 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोना बाधितांची संख्या 60083 झाली असून 08 क्रियाशील रुग्ण आहे. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 1133 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 98.10 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 01.89 टक्के एवढा आहे. जिल्ह्यात केवळ 0.01 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.

वाशिम जिल्ह्यात आणखी १ कोरोना बाधित; एका व्यक्तीला डिस्चार्ज
वाशिम : शहरातील १.कोरोना बाधितांची सद्यस्थिती-एकूण पॉझिटिव्ह – ४१७०४,ऍक्टिव्ह – १०,डिस्चार्ज – ४१०५६,
मृत्यू – ६३७

गडचिरोली जिल्ह्यात 4 कोरोना बाधित तर 1 कोरोनामुक्त

गडचिरोली, दि.26 : आज गडचिरोली जिल्हयात 455 कोरोना तपासण्यांपैकी 04 नवीन कोरोना बाधित आढळून आले. तसेच आज 01 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 30698 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 29919 व पोहचली.तसेच सद्या 33 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 746 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामूळे जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.46 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 0.11 टक्के तर मृत्यू दर 2.43 टक्के झाला.नवीन 04 बाधितांमध्ये गडचिरोली तालुक्यातील 02, अहेरी तालुक्यातील 00, आरमोरी 01, भामरागड तालुक्यातील 00, चामोर्शी तालुक्यातील 00, धानोरा तालुक्यातील 00, एटापल्ली तालुक्यातील 00, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 01, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 00, कोरची तालुक्यातील 00, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये 00, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये 00 जणांचा समावेश आहे. तर आज कोरोनामुक्त झालेल्या 01 रूग्णांमध्ये गडचिरोली मधील 01, अहेरी 00,  आरमोरी 00, भामरागड 00, चामोर्शी 00, धानोरा 00, एटापल्ली 00, मुलचेरा 00, सिरोंचा 00, कोरची 00, कुरखेडा 00 तसेच वडसा येथील 00 जणांचा समावेश आहे.