
तुमसर,दि.31ः- तालुक्यातील कर्कापुर ते सिलेगाव रस्ता बांधकामाच्या मागणीला घेऊन सोमवार(दि.30)ला कर्कापुर ग्रामवासीयांनी हरदोली(सि)राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करीत प्रशासनाचे लक्ष वेधले.आंदोलनाचे नेतृत्व सरपंच प्रल्हाद आगाशे,माजी सभापती कलाम शेख,माजी पंचायत समिती सदस्य हिरालाल नागपुरे,उपसरपंच शरद आतीलकर,अभय मिश्रा,गणेश भाऊसिंदपुरे,प्रवीण मिश्रा,नारायण सिंदपुरे,बालकदास ठवकर्,प्रफुल वराडे,रामेश्वर मोटघरे, अविनाश सिंदपुरे, माजी पोलीस पाटील मुकुंदा आगाशे,राजू आगाशे,श्रावण माहुले आदींनी केले.या आंदोलनाची दखल घेत तुमसरचे नायब तहसिलदार मेडे यांच्यासह उपविभागीय अभियंता चुर्हे व शाखा अभियंत्यानी एक महिन्याच्या आत रस्ता बांधकाम करुन देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले. एक महिन्यात मागणी पूर्ण न झाल्यास पुन्ही आंदोलन करण्याचा इशारा ग्रामवासियांनी दिला. आंदोलनात युगल आगाशे, अंकित आथिलकर, संतोष आगाशे, वासुदेव डहाळे,सुनील आगाशे, रमेश सिंदपुरे, गणेश सिंदपुरे, मुकुंदाजी आगाशे, लोकेश सिंदपुरे, शंकर सिंदपुरे, विक्रांत सिंदपुरे, मनोहर माहुले, महेश बुद्धे, पवन डहाळे, निखिल बुद्धे,अविनाश सिंदपुरे, गुलाब सिंदपुरे, रामू डहाळे, सोनू आगाशे, विलास आगाशे, विलास बुराडे, रोहित डहाळे, लक्ष्मण आगाशे,अजय सिंदपुरे,देवराव बुद्धे, यमराज आगाशे, अतुल आगाशे, लंकेश वाढइ, मनोज आथिलकर, सुनील आगाशे,रुपणारायन आगाशे दिलीप आगाशे, संजय आगाशे, रवींद्र सिंदपुरे, विनोद आगाशे, प्रभू भाऊ सिंदपुरे ,राहुल डहाळे, जयदेव डहाळे,भावराव सिंदपुरे, कुलदीप बोरकर, कृष्णा पडोळे,अमित बुद्धे, मोहन आगाशे, अतुल सिंदपुरे, मयुर आगासे, जयेंद्र मते, दद्दु आगाशे, व सर्व शेतकरी शेत मजूर करकापूर येथील असंख्य शेतकरी बांधव सहभागी झाले होते.




