35.7 C
Gondiā
Tuesday, June 9, 2026
Home राजकीय कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या अश्विनी रामाणे

कोल्हापूरच्या महापौरपदी काँग्रेसच्या अश्विनी रामाणे

0
18

blank

कोल्हापूर दि. १६ कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौरपदी काँग्रेसच्या अश्विनी रामाणे यांची निवड झाली आहे. त्यांनी भाजप-ताराराणी आघाडीच्या उमेदवार सविता भालकर यांचा ११ मतांनी पराभव केला.

उपमहापौरपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शमा मुल्ला निवडून आल्या आहेत. कोल्हापूर महानगरपालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाल्याने काँग्रेसचा महापौर होणार हे सुरुवातीपासूनच स्पष्ट होते.अश्विनी रामाणे यांना ४४ तर, सविता भालकर यांना ३३ मत मिळाली. उपमहापौरपदाच्या निवडणुकीत शमा मुल्ला यांनी भाजप-ताराराणीचे उमेदवार राजेंद्र शेळके यांचा पराभव केला. कोल्हापूर महापालिका निवडणुकीत काँग्रेसचे सर्वाधिक २७ आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे १५ नगरसेवक निवडून आले आहेत. ताराराणी आघाडीचे १९ आणि भाजपाचे १३ नगरसेवक आहेत. प्रत्यक्ष मतदानाच्यावेळी शिवसेनेचे चार नगरसेवक तटस्थ राहिले.

blank