ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी यांचे निधन

0
9

मुंबई –दि. १६- वडिल, काका, भाऊ या भूमिकांमधून ८०-९०च्या दशकात आपली वेगळी ओळख निर्माण करणारे हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते सईद जाफरी यांचे सोमवारी निधन झाले. ते ८६ वर्षांचे होते. त्यांची पुतणी शाहीने हीने फेसबुकवरुन सईद यांच्या निधनाची बातमी दिली.

शतरंज के खिलाडी, चश्मेबद्दूर, राम तेरी गंगा मैली, दिल, हिना या चित्रपटातील त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या. हिंदी बरोबर सईद यांनी अनेक आंतरराष्ट्रीय सिनेमांमध्येही काम केले होते.

गांधी, ए पॅसेज टू इंडिया या इंग्रजी चित्रपटातही त्यांनी काम केले होते. तंदुरी नाईटस, द फार पॅव्हेलियन सँण्ड, द ज्वेल इन द क्राऊन या टीव्ही मालिकांमध्येही त्यांनी काम केले होते.

मालेरकोटला पंजाबमध्ये सईद यांचा जन्म झाला होता. अलीगड मुस्लिम विद्यापीठातून त्यांनी शिक्षण घेतले. त्यानंतर परदेशात जाऊन त्यांनी अभिनयाचे प्रशिक्षण घेतले. अभिनेत्री-लेखिका मधुर जाफरी यांच्याबरोबर त्यांचा विवाह झाला होता. मात्र १९६५ मध्ये दोघे विभक्त झाले. त्यांना तीन मुले असून, मुलगी सकीना ही अभिनेत्री आहे.