कटरा (जम्मू) – वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी जात असलेले भाविकांचे एक हेलिकॉप्टर आज (सोमवार) कोसळल्याने वैमानिकासह सातजण ठार झाले.दुर्घटनाग्रस्त हेलिकॉप्टर हिमालयन हेली सर्व्हिस कंपनीचे असून, सहा भाविकांना घेऊन वैष्णोदेवी मंदिराकडे जात होते. मात्र, आग लागल्याने ते लगेच कोसळले. या अपघातात महिला वैमानिकासह सहा भाविक ठार झाल्याचे वृत्त आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या दुर्घटनेत अर्जूनसिंग, महेश, वंदना, सचिन, अमृतपाल यांच्यासह पाच वर्षांच्या अस्मिता हिचा मृत्यू झाला