कागदपत्रांची पूर्तता न करणाऱ्या राजकीय पक्षांची नोंदणी होणार रद्द

0
28

मुंबई : राज्य निवडणूक आयोगाकडे आयकर लेखा व लेखापरीक्षित लेख्याची प्रत सादर न करणाऱ्या अमान्यताप्राप्त नोंदणीकृत 280 राजकीय पक्षांना आयोगाने नोटीस बजावल्या आहेत. या पक्षांनी 30 डिसेंबर 2015 पर्यंत संबंधित कागदपत्रांती पूर्तता न केल्यास राज्य निवडणूक आयोगाकडून त्यांची नोंदणी रद्द केली जाणार असल्याचे नोटिसीमध्ये नमूद केले आहे, अशी माहिती राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी दिली.

श्री. सहारिया यांनी सांगितले की, राजकीय पक्षांना महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे नोंदणी करणे आवश्यक असते. राज्य निवडणूक आयोगाकडे 6 राष्ट्रीय, 2 राज्यस्तरीय, 9 इतर राज्यातील राज्यस्तरीय व 340 अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांची नोंदणी झाली आहे. नोंदणीकृत अमान्यताप्राप्त राजकीय पक्षांना नियमितपणे आयकर विवरणपत्र व लेखा परीक्षित लेख्याची प्रत राज्य निवडणूक आयोगाकडे सादर करणे आवश्यक असते. त्याची पूर्तता न करणाऱ्या राजकीय पक्षांना या नोटीसा बजावण्यात आल्या आहेत.

राज्य निवडणूक आयोगाकडे 2005 मध्ये नोंदणी झालेल्या 19 राजकीय पक्षांना पहिल्या टप्प्यात जून 2015 मध्ये नोटीस बजावण्यात आल्या होत्या. त्यापैकी केवळ तीन पक्षांनी कागदपत्रांची पूर्तता केली. सहा पक्षांच्या पत्त्यांवर नोटीसचा बटवडा झाला नाही. सहा पक्षांनी कुठलाही प्रतिसाद दिला नाही तर स्वाभिमानी पक्ष, जनसुराज्य पक्ष, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) आणि लोकभारती या चार पक्षांनी दोन महिन्यांची मुदतवाढ मागितली होती. मुदतवाढ देऊनही त्यांनी कागदपत्रांची पूर्तता केली नाही. त्यामुळे या चौघांसह सोळा पक्षांची नोंदणी रद्द करण्यात आली आहे. मात्र स्वाभिमानी पक्ष, जनसुराज्य पक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) या तीन पक्षांनी पुन्हा मुदतवाढ मागितली. त्यांना आता एक लाख रुपये दंड आकारून 30 डिसेंबर 2015 पर्यंत कागदपत्रे सादर करण्यासाठी मुदतवाढ दिली आहे. त्यानंतरही त्यांनी कागदपत्रे सादर न केल्यास त्यांची नोंदणी आपोआप रद्द होईल, असेही श्री. सहारिया यांनी सांगितले.

राज्य निवडणूक आयोगाने दुसऱ्या टप्प्यात नोटीस बजावलेल्या राजकीय पक्षांची (कार्यालयांच्या पत्त्यानुसार जिल्हानिहाय) नावे अशी:

मुंबई- 1) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, 2) जनादेश पार्टी, 3) भारतीय शेतकरी कामगार पक्ष, 4) राष्ट्रीय समाज पक्ष, 5) नॅशनल लोक तांत्रिक पार्टी, 6) भारिप बहुजन महासंघ, 7) सार्वभौमिक लोक दल, 8) भारतीय प्रजासत्ताक पक्ष, 9) राष्ट्रवादी समाजवादी पार्टी, 10) युनायटेड सेक्युलर काँग्रेस पार्टी, 11) होली ब्लेसिंग पीपल्स पार्टी, 12) लोकांचे दोस्त, 13) राष्ट्रीय लोकजागृती पार्टी, 14) अखिल भारतीय सेना, 15) वॉर व्हेटरन्स पार्टी, 16) राष्ट्रीय भीम सेना, 17) महाराष्ट्र राजीव काँग्रेस, 18) क्रांतिकारी जयहिंद सेना, 19) एस. राष्ट्रीय जनहित पक्ष, 20) डेमोक्रॅटिक पार्टी (डी.पी.), 21) भीमशक्ती रिपब्लिकन सेना, 22) महाराष्ट्र परिवर्तन सेना (म. प. से.), 23) ओबीसी एनटी पार्टी ऑफ इंडिया, 24) भारतीय मायनॉरेटीज सुरक्षा महासंघ, 25) हिंदू राष्ट्र सेना, 26) राष्ट्रीय सर्वसमाज पार्टी (इंडिया), 27) राष्ट्रहित पार्टी, 28) संविधान सुरक्षा पार्टी, 29) दलित मुस्लिम आदिवासी क्रांती संघ, 30) विकास कार्य सन्मान पार्टी, 31) भारतीय आवाज पार्टी, 32) राष्ट्रीय महाशक्ती पार्टी, 33) किसान गरीब नागरीक पार्टी, 34) स्वराज सेना, 35) इंडियन नॅशनॅलिस्ट पार्टी (एन), 36) जनकल्याण सेना 37) इन्डिपेन्डन्ट् कॅन्डिडेट्स पार्टी, 38) सरदार वल्लभभाई पटेल पार्टी, 39) आंबेडकरवादी जनमोर्चा, 40) भारतीय मानवतावादी पार्टी.

ठाणे/ पालघर- 1) सर्वप्रांतीय सेना, 2) शाहू सेना, 3) नेटीव्ह पीपल्स पार्टी, 4) भिवंडी विकास आघाडी (एकता मंच), 5) आगरी समाज विकास आघाडी, 6) मीरा-भाईंदर विकास मंच, 7) नॅशनल बहुजन काँग्रेस, 8) बहुजन विकास आघाडी, 9) लोकहितवादी लीडर पार्टी, 10) कल्याण-डोंबिवली महानगर विकास आघाडी, 11) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (एकतावादी), 12) उल्हास विकास आघाडी, 13) नॅशनल लोकहिंद पार्टी (गरीब नवाज), 14) सेक्युलर अलायन्स ऑफ इंडिया, 15) लोकहितवादी पार्टी, 16) रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सेक्युलर), 17) धर्मराज्य पक्ष, 18) बहुजन विकास सेना, 19) राष्ट्रीय सुशिक्षित बेरोजगार जनक्रांती सेना (महाराष्ट्र राज्य), 20) भारतीय बहुजन परिवर्तन सेना.

रायगड- 1) माथेरान विकास आघाडी, 2) खोपोली शहर विकास आघाडी.
रत्नागिरी- 1) महाराष्ट्र कोकण विकास आघाडी
सिंधुदुर्ग- 1) अखिल भारतीय क्रांतिकारी व्यक्ती विकास पक्ष.
नाशिक– 1) हिन्दू एकता आंदोलन पार्टी, 2) नाशिक जिल्हा विकास आघाडी, 3) नाशिक शहर जिल्हा नागरी विकास आघाडी, 4) तिसरी आघाडी मालेगाव, 5) भारतीय बहुजन सेना, 6) जनराज्य आघाडी, 7) स्वावलंबी, 8) भारतीय भूमीपुत्र मुक्ती मोर्चा, 9) नाशिक शहर विकास आघाडी, 10) तिसरा महाज, 11) मालेगाव विकास आघाडी, 12) अधिकार सेना.
धुळे- 1) मानव एकता पार्टी, 2) लोकसंग्राम, 3) शहर विकास आघाडी दोंडाईचा.
जळगाव- 1) शहर बचाव आघाडी, 2) खान्देश विकास आघाडी, 3) शहर विकास आघाडी, 4) अखिल भारतीय बजरंग दल, 5) जळगाव शहर विकास आघाडी, 6) जळगाव जिल्हा जनता आघाडी, 7) महानगर विकास आघाडी, 8) सावदा विकास आघाडी, 9) राष्ट्रीय अल्पसंख्याक महासंघ, 10) गर्जना लोकराज्य चळवळ (महाराष्ट्र), 11) महाराष्ट्र ईस्ट खान्देश एकता नगरविकास आघाडी, 12) जनक्रांती आघाडी, 13) चाळीसगाव शहर परिवर्तन आघाडी, 14) लोकसंघर्ष एकता विकास आघाडी, 15) नगर विकास आघाडी, 16) धरणगाव शहर विकास आघाडी, 17) धरणगाव शहर प्रगती आघाडी, 18) अमळनेर तालुका शहर विकास आघाडी, 19) मा. लोकनेते अनिलदादा देशमुख शहर विकास आघाडी 20) भारतीय जनता विकास आघाडी, 21) फैजपूर परिसर विकास आघाडी, 22) एरंडोल शहर विकास आघाडी, 23) शहर विकास आघाडी, 24) जयहिंद नवनिर्माण सेना, 25)जामनेर शहर विकास आघाडी.
नंदूरबार- 1) जिल्हा विकास आघाडी.
अहमदनगर– 1) जनशक्ती विकास आघाडी, 2) नेवासा तालुका विकास आघाडी, 3) राहाता तालुका विकास आघाडी, 4) कोपरगाव तालुका विकास आघाडी, 5) कर्जत तालुका विकास आघाडी, 6) जामखेड तालुका विकास आघाडी, 7) श्रीगोंदा तालुका विकास आघाडी, 8) राहूरी तालुका विकास आघाडी, 9) संगमनेर तालुका विकास आघाडी, संगमनेर, 10) श्रीरामपूर तालुका विकास आघाडी, 11) पाथर्डी तालुका विकास आघाडी, 12) नगर तालुका विकास आघाडी, 13) शेवगाव तालुका विकास आघाडी, 14) अकोले तालुका विकास आघाडी, 15) जन विकास आघाडी, 16) जनसेवा विकास आघाडी, 17) लोकसेवा विकास आघाडी, 18) परिवर्तन समता परिषद, 19) लोकशक्ती विकास आघाडी, 20) बहुजन क्रांती सेना, 21) महानगर विकास आघाडी, 22) पारनेर तालुका विकास आघाडी.
पुणे- 1) नेताजी काँग्रेस सेना, 2) शिरुर शहर विकास आघाडी, 3) नागरिक हित संरक्षण मंडळ विकास आघाडी, 4) आळंदी शहर विकास आघाडी, 5) श्री संत ज्ञानेश्वर शहर विकास आघाडी, 6) लोकशाही विकास आघाडी, 7)बहुजन भीमसेना, 8) बहुजन काँग्रेस पार्टी, 9) नॅशनॅलिस्ट रिपब्लिकन पार्टी, 10) अखिल भारतीय सम्राट सेना, 11) जनमत विकास आघाडी, 12) पुणे विकास आघाडी, 13) लोकशाही क्रांती आघाडी, 14) तळेगाव शहर विकास समिती, 15) जुन्नर शहर परिवर्तन आघाडी, 16) लोणावळा शहर विकास आघाडी, 17) रिपब्लिकन सोशॅलिस्ट पार्टी, 18) दौंड तालुका जनसेवा विकास आघाडी, 19) पुणे जनहित आघाडी, 20) भारतीय लोकसेवा पार्टी, 21) कॉमन मॅन पार्टी, 22) भीमराज्य लोकसत्ता पार्टी, 23) स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी, 24) भारतीय नवजवान सेना (पक्ष).
सोलापूर– 1) पंढरपूर विकास आघाडी, 2) राष्ट्रीय क्रांती दल, 3) समानता काँग्रेस पार्टी, 4) पंढरपूर लोकशाही आघाडी, 5) बार्शी परिवर्तन महाआघाडी, 6) स्वाभिमानी परिवर्तन आघाडी, 7) लोकराजा शाहू विचार आघाडी, 8) मंगळवेढा शहर विकास आघाडी, 9) पंढरपूर नागरीक सेवा आघाडी, 10) महाराष्ट्र परिवर्तन पार्टी, 11) नागरिक संघटना 12) देशभक्त नामदेवरावजी जगताप शहर विकास आघाडी, 13) परिवर्तन समता पार्टी.
सातारा- 1) म्हसवड सिद्धनाथ पॅनेल, 2) लोकमित्र जनसेवा आघाडी, 3) लोकशक्ती विकास आघाडी, 4) नगर विकास आघाडी, 5) जनकल्याण आघाडी, 6) सातारा विकास आघाडी, 7) जनता परिवर्तन पॅनल, 8) पाटण तालुका विकास आघाडी, 9) लोकशाही आघाडी, 10) खटाव माण विकास आघाडी 11) फलटण शहर नागरी संघटना, 12) जरंडेश्वर विकास आघाडी, 13) महाराष्ट्र क्रांतीसेना, 14) श्री लक्ष्मी डोंगराई देवी नगर विकास आघाडी, 15) मलकापूर शहर विकास आघाडी, 16) नागोबा आघाडी म्हसवड, 17) नगर विकास आघाडी, 18) राजेमाने पार्टी, 19) जावली विकास आघाडी, 20) यशवंत विकास आघाडी, 21) मा. यशवंतराव चव्हाण कृष्णा विकास आघाडी.
सांगली- 1) जनता आघाडी, 2) विकास महाआघाडी, 3) आष्टा शहर विकास आघाडी, 4) विकास आघाडी विटा 5) आष्टा शहर नागरिक संघटना, 6) नागरिक संघटना, 7) लोकशाही आघाडी, 8) विशाल काँग्रेस, 9) पश्चिम महाराष्ट्र स्वतंत्र राज्य पक्ष, 10) स्वाभिमानी विकास आघाडी, 11) विकास आघाडी, 12) रयत विकास आघाडी, 13) विकास आघाडी जत तालुका.
कोल्हापूर- 1) जनसेवा पार्टी (महाराष्ट्र), 2) युवक क्रांती आघाडी, 3) शहर विकास आघाडी, 4) यादव पॅनल आघाडी, 5) ताराराणी आघाडी पक्ष, 6) पेठ वडगाव विकास आघाडी, 7) राजर्षि शाहू विकास आघाडी, 8) शहर सुधारणा आघाडी, 9) श्री छत्रपती शिवाजी महाराज विकास आघाडी, 10) जनविकास आघाडी, 11) सिद्धेश्वर शहर विकास आघाडी, 12) मलकापूर शहर महाविकास आघाडी, 13) भ्रष्टाचार विरोधी जन-क्रांती आघाडी, 14) जयसिंगपूर शहर विकास आघाडी,
औरंगाबाद- 1) लोकविकास पार्टी, 2) भारतीय क्रांती सेना, 3) भारतीय आसरा लोकमंच, 4) लोकशाही विचार मंच, 5) सिल्लोड शहर परिवर्तन विकास आघाडी.
बीड- 1) गेवराई विकास आघाडी, 2) अंबेजोगाई विकास आघाडी, 3) राष्ट्रीय क्रांती सेना, 4) बीड विकास आघाडी, 5) स्वाभिमानी शेतकरी विकास आघाडी.
नांदेड– 1) स्वतंत्र भारत पक्ष, 2) महिला मानव विकास आघाडी, 3) बिलोली शहर विकास आघाडी, 4) संविधान पार्टी
जालना– 1) नगर विकास आघाडी.
लातूर- 1) भारतीय ज्वालाशक्ती पक्ष, 2) अखिल भारतीय सुशिक्षित बेरोजगार युवक संघटना पार्टी, 3) मातंग मुक्ती सेना, 4) महाराष्ट्र विकास आघाडी, 5) राष्ट्रीय संत संदेश पार्टी, 6) संभाजी सेना.
अमरावती– 1) नगर सुधार (समिती) आघाडी, 2) प्रहार पक्ष, 3) महाराष्ट्र स्वाभिमान काँग्रेस, 4) विदर्भ जनसंग्राम, 5) जनविकास काँग्रेस 6) वरुड विकास आघाडी, 7) अमरावती जनकल्याण आघाडी.
अकोला- 1) नगर विकास पार्टी, 2) आझाद हिंद काँग्रेस पार्टी, 3) अकोला महानगर विकास मंच, 4) आकोट विकास आघाडी, 5) अकोला विकास आघाडी.
यवतमाळ– 1) परिवर्तन विकास आघाडी, 2) विदर्भ जन आंदोलन आघाडी, 3) नगर विकास आघाडी, 4) सन्मान, 5) जनसेवा आघाडी.
वाशीम- 1) वाशीम जिल्हा विकास आघाडी, 2) ऋषिवट विकास आघाडी, 3) युवा-जन-सेना.
बुलढाणा- 1) बहुजन समाज पक्ष, 2) मलकापूर शहर सुधार आघाडी, 3) नांदुरा नवनिर्माण आघाडी, 4) नगर विकास आघाडी, 5) मलकापूर विकास आघाडी, 6) चिखली शहर विकास आघाडी.
नागपूर- 1) पीपल्स रिपब्लिकन पार्टी, 2) बहुजन रिपब्लिकन एकता मंच, 3) डेमोक्रॅटिक सेक्युलर पार्टी, 4) युथ फोर्स, 5) जनलोकपाल आघाडी, 6) नगर विकास आघाडी, 7) ग्रीन पार्टी ऑफ इंडिया, 8) भारतीय संताजी पार्टी, 9) जनसेवा आघाडी मोवाड, 10) नॅशनल संगमयुग पार्टी, 11) मायनॉरिटिज डेमोक्रॅटिक पार्टी.
वर्धा- 1) स्वतंत्र विकास आघाडी, 2) आंबेडकरवादी रिपब्लिकन पार्टी.
चंद्रपूर- 1) रिपब्लिकन आंदोलन.
गोंदिया- 1) नगर विकास समिती.
उत्तरप्रदेश: लखनौ- 1) सोशॅलिस्ट पार्टी (इंडिया), गोरखपूर- 1) पीस पार्टी.
आंध्रप्रदेश: हैदराबाद- 1) लोकसत्ता पार्टी, 2) ऑल इंडिया मजलिस इत्तेहदूल ए मुस्लिमिन, 3) आंबेडकर नॅशनल काँग्रेस.
छत्तीसगड: कोरबा- 1) गोंडवाना गणतंत्र पार्टी.