काश्‍मिरमध्ये चकमकीत चार दहशतवादी ठार

0
7

 वृत्तसंस्था

श्रीनगर -दि.२३,– काश्‍मीरमधील कुपवाडा आणि अनंतनाग जिल्ह्यांत दोन ठिकाणी उडालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा सुरक्षा रक्षकांनी खात्मा केला. राजौरी जिल्ह्यात पाकिस्तानकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. नियंत्रण रेषेनजिक भारतीय गस्ती पथकावर केलेल्या हल्ल्यात एक जवान हुतात्मा झाला. पाकिस्तानकडून काश्‍मिरात कुरापती करण्याचे काम सुरूच आहे. 

लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आज (सोमवार) दुपारी सिलिगावनजिक दहशतवाद्यांबरोबर सुरक्षा दलाची धुमश्‍चक्री उडाली. या वेळी प्रत्युत्तरादाखल भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी केलेल्या गोळीबारात दोन दहशतवादी ठार झाले. दहशतवाद्यांविरोधात कारवाई करण्यासाठी सुरक्षा दलाने आपली शोध मोहीम सुरूच ठेवली आहे. कुपवाडा जिल्ह्यातही एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात आले असून, आज अकराव्या दिवशीही जवानांनी दहशतवाद्यांविरोधातील मोहीम सुरूच ठेवली आहे. गेल्या आठवड्यात कर्नल संतोष महाडिक हुतात्मा झालेल्या मनिगहच्या घनदाट जंगलात आज एक दहशतवादी चकमकीत ठार झाला. या जंगलात मोठ्या शस्त्रसाठ्यासह काही दहशतवादी लपून बसले आहेत. या दहशतवाद्यांविरोधात लष्कराने मोहीम तीव्र केली आहे.