41.4 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home विदर्भ मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन

0
17

blank

चंद्रपूर दि. २६: विदर्भ राज्य आंदोलन समितीच्या वतीने स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती व शेतकर्‍यांच्या विविध समस्यांचा निपटारा करण्यासाठी ५ डिसेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर येथील निवासस्थानासमोर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे. यासाठी पूर्ण विदर्भातील नागरिकांना एकत्र आणण्यासाठी जोरदार तयारी सुरू असल्याची माहिती माजी आमदार अँड. वामनराव चटप यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.
निवडणुकीदरम्यान भाजपा आणि देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भातील जनतेला व शेतकर्‍यांना मोठमोठे आश्‍वासन दिले होते. मात्र फडणवीस सरकारला एक वर्ष पूर्ण होत असतानाही एकाही आश्‍वासनाची पूर्तता होताना दिसत नसल्याचे चटप यांनी सांगितले. स्वतंत्र विदर्भ राज्य निर्मितीचे आश्‍वासन देणारे हे सरकार आता विकासाची भाषा बोलत जनतेची दिशाभूल करीत आहेत. त्यामुळे त्यांना आश्‍वासनाची आठवण करून देणे गरजेचे आहे. यासाठीच हे आंदोलन असल्याचे चटप यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला किशोर पोतनवार, प्रा. एस.टी. चिकटे, अनिल दिकोंडवार, प्रभाकर दिवे, भगवानदास राणा, अयुब कच्छी आदी उपस्थित होते.

blank