31.2 C
Gondiā
Saturday, June 6, 2026
Home राजकीय गिरीष व्यास विधान परिषदेवर बिनविरोध

गिरीष व्यास विधान परिषदेवर बिनविरोध

0
22

blank

नागपूर,दि. १२ – विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या जागेसाठी नागपूर विभागातून भारतीय जनता पक्षाचे गिरीष व्यास बिनविरोध निवडून आले.कॉंग्रेसचे उमेदवार अशोकसिंह चव्हाण यांच्यासह सर्व उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतल्याने गिरीष व्यास हे बिनविरोध निवडून आले आहेत. विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था जागेच्या निवडणुकीसाठी २७ डिसेंबरला मतदान होणार आहे.सध्याचे विधान परिषद सदस्य  राजेंद्र मुळक यांच्या रिक्त होणाऱ्या जागेवर भाजप तर्फे गिरीष व्यास तर कॉंग्रेस तर्फे अशोकसिंह चौहान यांना उमेदवारी देण्यात आली होती.आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. कॉंग्रेसच्या अशोकसिंह चौहान सह सर्व उमेदवारांनी आपला अर्ज मागे घेतल्याने गिरीष व्यास यांची विधान परिषदेवर बिनविरोध निवड झाली आहे

blank