पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचा सोमवारी मोर्चा

0
13

गोंदिया,दि.१३ः महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने नागपूर हिवाळी अधिवेशनावर सोमवारी(ता.१४) मोर्चा नेण्यात येणार आहे. दिवंगत शिक्षक विजय नकाशे यांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देणे, राज्यभरातील शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे काढणे, जुनी पेन्शन योजना लागू करणे, प्रत्येक शाळेला डिजिटल खोली तयार करण्याकरिता आर्थिक तरतूद करणे, सर्व शिक्षकांना सरसरट निवड श्रेणी लागू करणे, विषय शिक्षकांना वेतनवाढ देणे आदी मागण्यांचा समावेश आहे. मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन रघुपती अगळे, देशराज रहांगडाले, हरिराम येळणे, भारती तिडके, जयश्री शिरसाटे, गौरी रायकवार, आर.पी. करंडे, एन.सी. बिजेवार, पी. के. खोब्रागडे आदींनी केले.